UPSC- स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. आजच्या विशेष लेखामध्ये पुराणशास्त्र आणि संस्कृती या विषयामधील तज्ज्ञ देवदत्त पट्टनायक मनुस्मृती आणि जातिव्यवस्थेबद्दल त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट करत आहेत.

आज प्रत्येकजण मनुस्मृतीविषयी बोलताना आणि त्याचा संबंध जातिव्यवस्थेशी जोडताना आपण पाहतो. परंतु मनुस्मृती नेमकी काय आहे? हे समजून घेण्यासाठी भारतीय इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : हस्तक्षेपास एवढा विलंब का झाला?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

मौर्य हे भारतीय इतिहासातील पहिले साम्राज्य होते. त्यांनी आपले राज्य व्यापारी मार्गांचा वापर करून विस्तारले. पाटलीपुत्रपासून उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडील भारताच्या वेगवेगळ्या काना-कोपऱ्यांपर्यंत विस्तारलेल्या विविध व्यापारी मार्गांद्वारे त्यांनी आपली सत्ता विस्तारत नेली. याविषयीची माहिती सम्राट अशोकाने कोरवून घेतलेल्या राजाज्ञांवरून समजते. या राजाज्ञा तत्कालीन सामाजिक-धार्मिक परिस्थिती समजून घेण्यासाठी मदत करतात. त्याकाळी समाजात दोन विचारसरणींचे वर्चस्व होते. एक म्हणजे, श्रमण किंवा बौद्ध व जैन संघांचे तर दुसरे म्हणजे ब्राह्मण जे वेदांना प्रमाण मानत होते. या राजाज्ञा आपल्याला मुखत्त्वे धार्मिक बाबींबद्दल थेट माहिती देत नाहीत. किंबहुना त्यांचा कल जरी बौद्ध धम्माच्या बाजूने झुकत असला तरी कोणत्याही विशिष्ट धर्माला त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसत नाही. याच सुमारास साम्राज्य आणि राजेशाहीची कल्पना अधिक प्रभावशाली ठरली, त्यामुळे भारतभर विविध राज्ये स्थापन झाली. या काळात जुनी वैदिक पद्धत प्रसंगानुरूप असल्याचे दिसते. जुन्या वैदिक मार्गात ग्राम्य आणि कृषी समुदायांचा पुरस्कार करण्यात आल्याचे दिसते. हे आपल्याला ब्राह्मणग्रंथात असलेल्या पद्य आणि गद्यातून आढळून येते. या वैदिक मार्गात मोठ्या सामूहिक समारंभाचा समावेश होता. ज्यात अग्निवेदीचाही समावेश होता आणि आकाशात राहणाऱ्या राहणाऱ्या देवतांना आवाहन केले जात होते.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास। भारतीय स्थापत्यकलेतील ९ प्रभावी क्षितिजे

वैदिक मार्गांकडून व्यापारवादाकडे संक्रमण

पण ते जग संपुष्टात आले आणि व्यापाराला केंद्रस्थानी ठेवून एक नवीन जग उदयास आले. या जगात उत्तर भारतातील बाजारपेठांना मध्य आशियापर्यंत आणि विंध्य पर्वताच्या पलीकडे दख्खनपर्यंत आणि भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यापर्यंत जोडणारे महामार्ग होते. याच पार्श्वभूमीवर वैदिक मार्गाची पुनर्रचना करावी लागली आणि याच काळात ब्राह्मणांनी वर्णाश्रम पद्धतीवर आधारित नवीन सिद्धांत लोकप्रिय करण्यास सुरुवात केली. धर्मशास्त्रे ही ब्राह्मणांनी एकत्रित केलेली नियमपुस्तिका होती. ज्यात लोकांनी त्यांचे जीवन कसे जगावे हे स्पष्ट केले होते. त्यांनी समाजाला चार प्रमुख वर्गात आणि प्रत्येक व्यक्तीचे जीवन चार टप्प्यात विभागले. यात सांगितले गेले की, आपल्या जातीतील व्यवसायांचे पालन करून आपण ज्या श्रेणीत आहोत त्यानुसार आपल्याला जीवन जगायचे आहे. आपण आपले जीवन प्रथम विद्यार्थी म्हणून, नंतर गृहस्थ म्हणून, नंतर वानप्रस्थी म्हणून आणि शेवटी एक संन्यासी म्हणून जगले पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, त्यांनी कौटुंबिक व्यवसाय आणि विवाह या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिले. हे उघडपणे बौद्ध तत्त्वाला विरोध करणारे होते, ज्यात विवाह न करणे, कौटुंबिक व्यवसायाचा त्याग करणे आणि संन्यासी होणे हे समाविष्ट होते. याच कालखंडापासून धर्मशास्त्रे लिहिली जाऊ लागली. सुरुवातीच्या धर्मशास्त्रांना धर्मसूत्रे म्हणून ओळखले जात होते. कारण ती संक्षिप्त गद्य किंवा सूत्रांमध्ये लिहिली गेली होती. ही सूत्रं गौतम आणि बौधायन यांनी इसवी सनपूर्व ३०० मध्ये लिहिली. धर्मशास्त्राबरोबरच भौतिक सुखाविषयीचे कामशास्त्र, अर्थशास्त्र आणि मोक्षशास्त्र म्हणता येईल अशा मुक्तीविषयीचे विविध वैदिक तत्त्वज्ञान सांगणारे ग्रंथ उदयास आले. या सर्व कल्पना आपल्याला महाभारताच्या शांती पर्व आणि अनुशासन पर्वामध्येही आढळतात.

मनुस्मृती पूर्वीच्या धर्मशास्त्रांपेक्षा वेगळी कशी आहे?

इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात ज्यावेळी गुप्त साम्राज्य उदयास येत होते. त्यावेळी मनुस्मृतीची रचना केली जात होती. मनुस्मृती ही पूर्वीच्या धर्मसूत्रांपेक्षा थोडी वेगळी होती. तिने पूर्वीची सूत्र शैली सोडून दिली आणि श्लोक शैलीचे अनुसरण केले. ती अधिक काव्यात्मक आहे. ही शैली परंपरेने धार्मिक ग्रंथांमध्ये आढळते. मनुस्मृतीला मानव धर्मशास्त्र म्हणूनही ओळखले जाते. असे सांगितले गेले की, “ हे शास्त्र मनूने तयार केले आहे. मनू हाच पहिला मानव आहे आणि हा ग्रंथ ब्रह्मदेवाच्या निर्देशानुसार लिहिला गेला आहे.” या ग्रंथाने धर्मशास्त्राला धार्मिक महत्त्व प्राप्त करून दिले. यानंतर धर्मसूत्रे ही ब्राह्मणांनी लिहिलेले धर्मनिरपेक्ष ग्रंथ राहिले नाहीत. या ग्रंथांमध्ये मांडलेल्या धार्मिक सिद्धांताची व्युत्पत्ती ही वेदांमधून असल्याचे सांगण्यात येऊ लागले.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | मातीची भांडी संस्कृतीची झलक कशी देतात?  

“शेवटी यात राजसत्तेचा व्यवहार, राजाने आपले जीवन कसे जगावे, राजेशाही आणि देशाचा कारभार चालवण्याचे कायदे इत्यादी अर्थशास्त्रात आढळणाऱ्या कल्पनांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला. हे यापूर्वीच्या धर्मशास्त्रांमध्ये आढळत नव्हते.”

पूर्वीच्या धर्मशास्त्रांनी व्यक्तींनी त्यांचे जीवन कसे जगावे यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. त्यात राजसत्तेशी, राज्याशी संबंधित मुद्यांना महत्त्व नव्हते. मनुस्मृतीने राज्यविषयक अनेक बाबी हाताळल्या, ज्यामुळे ती राजांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली.

मनुस्मृतीवर अनेक भाष्य आणि निबंध लिहिले गेले. या निबंध\ भाष्यांचा भारतातील अनेक राज्यांमध्ये तसेच आग्नेय आशियामध्ये त्यांचा प्रसार झाला. उदाहरणार्थ, बर्मा आणि थायलंडच्या राजांनी मनुस्मृतीचा संदर्भ दिलेला आढळतो. परंतु, आग्नेय आशियामध्ये मनुस्मृतीच्या राजेशाही पैलूंवर लक्ष केंद्रित केले गेले, जातीच्या घटकांचा समावेश केला नाही. याउलट, भारतात असे दिसते की, राज्याचा कारभार करण्यासाठी असलेल्या नियमांपेक्षा जातीला अधिक प्राधान्य दिले आहे, त्यामुळेच ती अधिक कुप्रसिद्ध झाली.

धर्मशास्त्रांवर टीका

यातला कळीचा मुद्दा म्हणजे धर्मशास्त्रांचा असा विश्वास आहे की, वेगवेगळ्या लोकांसाठी त्यांच्या त्यांच्या समुदायानुसार कायदे आहेत. परंतु, समाजात काय स्थान आहे यावर आधारित लोकांमध्ये करण्यात आलेला हा भेदभाव समानतेच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे, म्हणूनच आज विद्वानांनी त्याला आव्हान दिले आहे. यात स्त्रियांना पुरुषांपेक्षा कनिष्ठ मानले गेले आहे. विसाव्या शतकात स्त्रियांच्या हक्कांच्या चळवळींचा उदय होईपर्यंत सर्व समाजांमध्ये हीच परिस्थिती होती.
सर्व धर्मशास्त्रे असे मानतात की, कायदे हे स्थल, काळ आणि समाजाच्या गरजांनुसार बदलले पाहिजेत. कोणताही कायदा शाश्वत किंवा बदलता येणार नाही असा नसतो. यामुळेच धर्मशास्त्रे जगाच्या इतर भागात आढळणाऱ्या धार्मिक आज्ञांपेक्षा खूप वेगळी आहेत. ती अत्यंत लवचिक आहेत, त्यामुळे ती इतरांच्या तुलनेत उपयुक्त ठरतात.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती | वेदांचे महत्त्व आणि विधी

विषयाशी संबंधित प्रश्न:

मनुस्मृती म्हणजे काय? पूर्वीच्या धर्मशास्त्रांपेक्षा ती वेगळी का आहे?
मनुस्मृतीच्या ठळक वैशिष्ट्यांची चर्चा करा.
भारतात मनुस्मृतीतील राज्याशी संबंधित मुद्यांपेक्षा जात व्यवस्थेला प्राधान्य दिल्याचे दिसते; मत व्यक्त करा.