डॉ.श्रीराम गीत

साठ वर्षांपूर्वी स्वातंत्र्यदिनी
बँडचे तालात गाजणारे गीत
‘जिंकू किंवा मरू’,
टीपेला गेलेले आवाज, चिनी आक्रमणाचा परिणाम
नंतर पाकशी लढा
कॉलेजमधे सक्तीच्या एनसीसीने सुरुवात
सक्ती उपयोगी पडत नाही
मनशक्ती काय? ते कळायचे वय नाही
शिक्षण संपले, ७१चे युद्धही संपले.
हातातल्या पदवीचे करायचे काय?
याच प्रश्नाने दमछाक केलीय पन्नास वर्षे साऱ्यांची
कॉलेज गल्लो गल्ली, क्लासेसचे तर पेवच फुटले
कधी न दिसलेले ८० टक्के शेकडय़ाने मिळू लागले.
कोण करिअर म्हणे, कोण कॅरियर
पण करिअर वृत्तांत वाचू लागले
करिअर करिअर आणि करिअर अभ्यास केला तर होईल करिअर?
किती लाखात होईल करिअर? याचे उत्तर नाही कोणाकडे?
सरकारी नोकरीतच का करिअर?
आयटीविना नाही का करिअर?
इंग्रजी नाही, करिअरच नाही?
शिका रे, खूप शिका रे, करा एकदाची करिअर.
कॉम्प्युटरची दुनिया वेड लावे.
डब्बा मोबाइल, स्मार्ट मोबाइल, लाखाचा मोबाइल
कॉलेजसाठी लॅपटॉप नवा कोरा.
युनेस्कोचा मोठ्ठा शोध, असं काही नसतं, राजा खडूफळाच शिकवतो.
शिकतानाच दमछाक. पुढे काय?
चर्चा करिअरची, पण गरज साध्याशा नोकरीची.
काम काय? विचारायचं कशाला? पगार इतकाच? मग करियरचं काय?
पदवीधर हुशार, असला उत्तम. पगार द्यायचा, अन काम पण शिकवायचे?
चुकापण पदरात घालायच्या? उमेदवाराला हवा पगार, पगार.
अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आर्यलड.
शिकायला, नोकरीला, राहायला
रोज रोज मनात अन् स्वप्नात
पल्याडकडे डोळे लावून बसणार
नववीतला मुलगा म्हणतो, करिअर करायचीय
पीएच.डी पण म्हणतो, मला करिअरच करायचीय
काय शिकू? का शिकू? प्रश्नच पडत नाही
तुला हवे ते शिक, नाहीतर मी सांगतो ते गप शिक
पालकांनी कधीतरी विचारावं, माझी करिअर झाली का?
प्रश्न तिथेच सुटतील.
खूप पैसे, म्हणजे करिअर का?
का खूप पैसे मिळवायला शिकणे म्हणजे करिअर?
हे प्रश्न न पडणारे सुखी होतात.
देशात परदेशात असतील तिथे काम करतात, कमावतात.
सुख सुख म्हणजे काय? ते यांना बघून कळते.
रॅट रेस, रॅट रेस, आणि रॅट रेस ती टळते कुठे? कुठेच नाही
यूएस व्हिसा असो वा ग्रीन कार्ड
ती रॅट रेस? नाही बरं का
तो वा ती तशी हुशारच
अभ्यासाची बैठकच नाही हो..
मागायच्या आधीच देतो आम्ही, नाही शब्दच माहीत नाही
त्यांना हवे काय तेच कळत नाही
टी-शर्ट, शूज, जिमची फी
सार आहे जागच्या जागी.
मोबाइलगेम चालू, आम्ही समोर तरी डोकं वर कोणाचंच नाही
शिकण्याचं आणि करिअरचं नावपण नाही.
आजकालची जनरेशन होऽऽ आम्ही असे नव्हतो, सांगणे एकच
काहीही करा, मन लावून करा,
पोरांचे मन ना शिकण्यात ना कामात, आमचीच झोप उडलीय,
तुम्हीच सांगा, करियर कशी करायची?
सांगताय ना? करिअर कशी करायची?
काहीतरी सांगा ना, स्पर्धा कशी टाळायची?
लवकर सांगा, पटकन सांगा ना करिअरला उशीर होईल..

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय
south korea president yoon suk yeol faces impeachment after martial law debacle
अन्वयार्थ : काळरात्रीनंतरचा उष:काल!
Story img Loader