How To Prepare For JEE Exam : परीक्षा अन् तीही जेईईसारखी आव्हानात्मक परीक्षा म्हटले की, भरपूर तयारी, मेहनत, अभ्यास लक्षात ठेवणे, वारंवार सराव करणे आदी अनेक गोष्टी करणे अत्यावश्यक असते. आणि तसे केले, तरच त्या विद्यार्थ्याला मेहनतीचे गोड फळ निकालात दिसून येऊ शकते. पण, शाळा, कॉलेजमध्ये जसा आपण परीक्षेसाठी अभ्यास करतो, तसाच अभ्यास जेईई मेनसारख्या (Tips for JEE Exam) कठीण परीक्षांसाठी करावा लागतो का?
अनेक विद्यार्थ्यांना असे वाटते की, पुस्तके आणि कोचिंग क्लासेसमुळे त्यांना जेईई मेनसारख्या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यास मदत होईल. पण, जास्त अभ्यासामुळे अनेकदा चांगले निकाल मिळण्याऐवजी ताणतणाव निर्माण होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर जेईई मेनमध्ये १०० पर्सेंटाइल गुण मिळविणाऱ्या एका विद्यार्थ्याने आज या परीक्षेचा अभ्यास नेमका कसा करावा (Tips for JEE Exam) याबद्दलची माहिती दिली आहे.
जेईई मेन ही भारतातील सर्वांत कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत पास होण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अभ्यास करताना समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, ते अनेकदा पुस्तकांमध्ये हरवून जातात. त्यामुळे प्रेरणा कमी होऊ शकते आणि चिंता वाढू शकते. अशा विद्यार्थ्यांना जेईई मेनमध्ये १०० पर्सेंटाइल गुण मिळविणाऱ्या सक्षम जिंदालने (Saksham Jindal) एक सोपी; पण प्रभावी टिप (Tips for JEE Exam) शेअर केली आहे. रसायनशास्त्रासाठी (Chemistry) त्याने पूर्णपणे एनसीईआरटी अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित केले. अभ्यासासाठी अतिरिक्त पुस्तकांची आवश्यकता नाही. त्याचबरोबर आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी वारंवार प्रश्नांचा सराव करण्याचे महत्त्वही त्याने अधोरेखित केले.
योग्य योजना, नियमित विश्रांती, तणावमुक्त मानसिकता (Tips for JEE Exam) …
तसेच सक्षम जिंदाल म्हणाला की, परीक्षेत यश मिळवण्यासाठी संतुलित दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. अभ्यास साहित्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे. अभ्यासासाठी योग्य योजना, नियमित विश्रांती, तणावमुक्त मानसिकता आदी अनेक सकारात्मक गोष्टी परीक्षेची चांगली तयारी करण्यास मदत करू शकतात.
जेईई मेनव्यतिरिक्त सक्षमने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९७.८ टक्के गुणांसह उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याचबरोबर त्याने विविध ऑलिंपियाडमध्ये पदकेही जिंकली. हिसारमधील एका शैक्षणिकदृष्ट्या प्रवृत्त कुटुंबातून येणारे त्याने मिळविलेले हे यश म्हणजे त्याची हुशारी आणि योग्य तयारी यांचा चांगला परिपाक आहे, असे म्हणावे लागेल.
तर सक्षम जिंदालने दिलेल्या टिप्सनुसार- जेईई मेनच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास योजनेचे पालन करावे. तसेच, फ्लॅशकार्डसारख्या सक्रिय शिक्षण पद्धतींचा वापर करावा आणि मागील पेपर्सचासुद्धा सराव करावा. लक्ष विचलित न करणारे वातावरण, पुरेशी झोप, व्यायामासह निरोगी जीवनशैली या बाबीही परीक्षेचा चांगला अभ्यास होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आत्मविश्वास राखणे आणि अनावश्यक ताण टाळणे यांद्वारे तुम्ही परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकता.