How to prepare for JEE Main 2025 : भारतातील सर्व अभियांत्रिकी प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांपैकी एक म्हणजे संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE – Joint Entrance Examination), जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) सारख्या चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत करते. JEE Advanced द्वारे आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) मध्ये प्रवेश घेऊ शकतो

JEE मेनच्या तयारीसाठी चांगला अभ्यास, अभ्यासाचे योग्य नियोजन व शिस्त असणे आवश्यक आहे. ऑनलाइन स्रोत सहज उपलब्ध असल्यामुळे अनेक विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करण्याचा पर्याय निवडत आहेत.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

विद्यार्थ्यांनी जेईई मेनचा अभ्यास कसा करावा, याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने विद्यामंदिर क्लासेसचे सह-संस्थापक संदीप मेहता यांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली.

परीक्षेची रचना आणि अभ्यासक्रम समजून घेणे

कोणत्याही परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि परीक्षेची रचना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जेईई मेनमध्ये दोन पेपर असतात. पहिला पेपर हा BE किंवा BTec चे शिक्षण घेण्यास इच्छुक असणार्‍यांसाठी असतो. ते या पेपरवर अधिक लक्ष केंद्रित करतात तर दुसरा पेपर BArch or BPlanning साठी असतो. पहिला पेपर गणित, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र अशा तीन विषयांमध्ये विभागलेला आहे. यापैकी प्रत्येक विषयाला समान महत्त्व आहे. त्यासाठी विचारलेले प्रश्न पर्यायी स्वरूपाचे असतात आणि चुकीच्या उत्तराला नकारात्मक गुण (Negative Marking) मिळतात.

हेही वाचा :

खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

भौतिकशास्त्रामध्ये – Modern physics, mechanics, electrodynamics, thermodynamics व Optics हे सर्वांत महत्त्वाचे विषय आहेत.

रसायनशास्त्रामध्ये Inorganic, physical व organic chemistry कडे विशेष लक्ष द्यावे.

गणितामध्ये Geometry, Algebra, Calculus व Trigonometry वर जास्त भर द्यावा.

अभ्यासाचे वेळापत्रक महत्त्वाचे

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासासाठी दिनचर्या तयार करणे खूप महत्त्वाचे आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दिनचर्येचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा स्वत: घरी अभ्यास घरून परीक्षेची तयारी करता, तेव्हा वेळेचे व्यवस्थापन करणे आणि शिस्त जास्त महत्त्वाची असते. त्यासाठी अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

दैनंदिन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा – तुम्हाला जमेल आणि सोपे पडेल अशा भागांमध्ये अभ्यासाचे विभाजन करा. त्यानंतर दैनंदिन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक विषयासाठी दररोज किती वेळ द्यावा, हे ठरवा; जेणेकरून तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमाचे नियोजन करता येईल.

आठवड्यातून एकदा पुनरावलोकन करा – आपण पूर्ण आठवडा काय अभ्यास केला, याचे एकदा पुनरावलोकन करा. त्यासाठी एक दिवस निवडा. त्यामुळे तुम्हाला अभ्यास नीट लक्षात राहतो आणि पुनरावलोकन करताना तुम्हाला आलेल्या अडचणींमुळे कोणत्या विषयाचा आणखी अभ्यास करण्याची गरज आहे, हे तुमच्या लक्षात येते.

मॉक परीक्षा – आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मॉक परीक्षेचे नियोजन करा. वारंवार मॉक परीक्षा दिल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो.

स्वमूल्यांकन आणि नियमित सराव गरजेचा

जेईई मेनचा अभ्यास करताना सातत्याने अभ्यासाचा सराव करणे आणि मूल्यमापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी या पूर्वीच्या सर्व जेईई मेन स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा.

हेही वाचा : Success Story : सलून व्यवसाय ते ४०० गाड्यांचा मालक होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; आमिर खान, अमिताभ बच्चन यांनाही दिली कार सेवा

सराव करताना या टेक्निक लक्षात घ्या

वेळेनुसार सराव – जेईई मेन स्पर्धा परीक्षेची तयारी करताना वेळ खूप महत्त्वाचा आहे. वेळेच्या मर्यादा ठरवीत प्रश्नांची उत्तरे सोडविण्याचा प्रयत्न करा.

चुका तपासा – तुम्ही दिलेल्या सराव परीक्षेनंतर प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर जाणून घ्या. एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले, तर ती चूक तपासा, योग्य उत्तर शोधा आणि ती चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी घ्या.

कमकुवत विषयांकडे लक्ष द्या – जे विषय तुम्हाला कठीण वाटतात किंवा सराव परीक्षेत तुम्हाला ज्या विषयांची उत्तरे लिहिण्यास अडचण जाते, त्यावर लक्ष द्या. इंटनेटचा वापर करा आणि विषय नीट समजून घ्या.

जीईई मेन स्पर्धा परीक्षेचा सखोल अभ्यास करताना खालील पद्धतींचा वापर करा

एनसीइआरटी (NCERT) पुस्तके – विषय सखोल समजून घेण्यासाठी एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांचा वापर करा.

व्हिज्युअल साहित्याचा वापर – कठीण विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी व्हिज्युअल साहित्याचा वापर करा.

समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा – फक्त सूत्र लक्षात न घेता, त्या सूत्रांद्वारे समस्या सोडविण्याचा नियमित सराव करा.

प्रेरित राहणे आणि तणाव हाताळणे महत्त्वाचे

घरी जेईई मेनचा अभ्यास करणे मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते. स्वत:ला सतत प्रेरित ठेवणे आणि अभ्यासामुळे येणारा तणाव हाताळणे खूप महत्त्वाचे आहे.

शॉर्ट टर्म उद्दिष्टे तयार करा – अनेकदा खूप मोठी उद्दिष्टे साध्य करायची असतील, तर तणाव येतो. त्यामुळे सुरुवातीला शॉर्ट टर्म उद्दिष्टे तयार करा. तुमच्या मोठ्या उद्दिष्टांना शॉर्ट टर्ममध्ये विभाजित करा. ही बाब तुम्हाला प्रेरित राहण्यास मदत करील आणि तुम्हाला तणावसुद्धा येणार नाही.

संवाद साधा – ज्ञान शेअर करण्यासाठी, एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ऑनलाइन अभ्यास गटामध्ये सहभागी व्हा. संवाद साधा.

शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहणे – आपल्या शरीर आणि मनाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज शारीरिक हालचालींसाठी वेळ काढा. योगा, ध्यान व नियमित व्यायामामुळे तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा : दूरसंचार मंत्रालयात नोकरीची संधी! २७ पदांसाठी होणार भरती; ९० हजारांपर्यंत मिळू शकतो पगार, वाचा कोण करू शकते अर्ज?

परीक्षेचा तणाव कसा कमी करावा?

माइंडफुलनेस टेक्निक – खोल व दीर्घ श्वास घ्या. योगा व ध्यान करा; ज्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल आणि तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकाल.

संतुलित आहार – अभ्यासात एकाग्रता खूप महत्त्वाची आहे आणि एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी पोषक घटकांनी समृद्ध असा संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

झोप – रात्री सात ते आठ तासांची चांगली झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे अनेकदा अभ्यासात अडथळा निर्माण होतो.

परीक्षेच्या नोटीफिकेशनकडे नियमित लक्ष द्या

जेईई मेन परीक्षेच्या सर्व नोटिफिकेशनकडे नियमित लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) वेबसाइट वारंवार या परीक्षेसंदर्भात माहिती देते. अर्ज फॉर्म, परीक्षेच्या तारखा व अभ्यासक्रमामध्ये होणारे बदल यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.