UPSC MPSC Exam 2025 Syllabus Time Management Study Material Video : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाने २०२५ पासून होणाऱ्या परीक्षेच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २०२५ पासून होणारी परीक्षा आता वर्णनात्मक पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी तयारी नेमकी कशी करायची? अभ्यासक्रम काय असेल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेच नियोजन कसं करायचं? यासंदर्भात सागर भस्मे यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी केमिकल इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केलं असून ते गेल्या ८ वर्षांपासून यूपीएससी/एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
‘लोकसत्ता डॉटकॉम’ने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५ जूनपासून ‘यूपीएससी आणि एमपीएससी’ अशी एक स्वतंत्र कॅटेगरी सुरू केली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं आता विद्यार्थ्यांसाठी सोप्पं झालं आहे. ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने सुरू केलेल्या या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध होत आहे. त्यासाठी यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, आंतरराष्ट्रीय संबंध, इतिहास, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, शासन व्यवहार आणि चालू घडामोडी या सर्व महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरांचा सराव करण्यासाठी प्रश्नसंचही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यूपीएससी-एमपीएससी संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा…
यूपीएससी आणि एमपीएससी संदर्भातील लेख वाचण्यासाठी काय करावे?
सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी www.lokatta.com या वेबसाईटवर लॉग- इन करून यूपीएससी/ एमपीएससी या कॅटेगरीवर क्लिक करावे. त्यानंतर यूपीएससी आणि एसपीएससीशी संबंधित अभ्यासक्रमासह विविध लेख तुम्हाला वाचता येतील.