How to Write a Resignation Letter : सध्याच्या स्पर्धात्मक जगात नोकरी मिळवणे खूप कठीण आहे पण तुम्ही जर चांगले काम केले तर तुम्हाला नवीन नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी नोकरी करतो तेव्हा कालांतराने आपल्याला नोकरीमध्ये बदल करावासा वाटतो. चांगली संधी, उत्तम पगार आणि पद मिळत असेल तर आपण राजीनामा देऊन समोरून आलेल्या नोकरीची ऑफर स्वीकारतो पण सध्याच्या कंपनीला कसा निरोप द्यायचा, राजीनामा कसा लिहायचा, हे अनेकांना माहीत नसते. आज आपण राजीनामा पत्र कसे लिहायचे, हे जाणून घेणार आहोत. (resignation guidelines to include in professional resignation letter)

तुम्ही राजीनामा पत्र कोणाला लिहित आहात?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही राजीनामा पत्र कोणाला लिहित आहे, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या बॉसला, एचआरला किंवा सर्वात वरच्या बॉसला ईमेल पाठवत आहात का? मग थांबा.
सर्वप्रथम तुम्ही तुमचा राजीनामा तुमच्या बॉसला पाठवा. त्यांनी स्वीकारल्यानंतर तुम्ही एचआरला मेल करा किंवा बऱ्याच कंपनीमध्ये बॉसला राजीनामा पत्र लिहताना एचआरला सीसी मध्ये ठेवता येते.

हेही वाचा : पुणे महानगरपालिकेत १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पगार, पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

राजीनामा पत्रात ५ मुद्दे मांडणे आवश्यक आहे.

१.पत्राची तारीख
२. तुमचा कंपनीमध्ये शेवटचा कामाचा दिवस
३. मॅनेजरचा आदराने उल्लेख करावा.
४. राजीनामा का देत आहात? यामागील कारण
५. तुमची सही

खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

  • लक्षात ठेवा, राजीनामा पत्र क्रिएटिव्ह असण्याची गरज नाही. ते एक औपचारिक पत्र आहे त्यामुळे ते खूप साधे असायला हवे. तुम्ही ज्या पदाचा राजीनामा देत आहात त्या पदाविषयी सांगा आणि तुमच्या शेवटच्या कामाच्या दिवसाची तारीख सांगा.
  • या पत्रात लिहताना सौम्य भाषा व आशावादी टोन वापरा. पत्राद्वारे तुम्ही कळवा की तुमच्या बदली येणार्‍या व्यक्तिला प्रशिक्षण देण्यास तुम्ही मदत करणार
  • पुढे, तुमच्या बॉसचे आभार माना, ज्यांनी तुम्हाला संधी दिली. तुम्ही नोकरीत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा आनंद घेतला आणि शिकला आहात त्याचे थोडक्यात वर्णन करा.
  • नवीन ठिकाणी रूजू होण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात, हे तुमच्या शब्दात मांडा
  • लक्षात ठेवा, तुमच्या राजीनामा पत्रात कुणाविरूद्ध टीका किंवा तक्रार नसावी. सकारात्मक दृष्टीने राजीनामा पत्र लिहून निरोप घ्या.