HPCL Bharti 2023 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे काही जागांसाठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत वरिष्ठ अधिकारी, सहायक व्यवस्थापक/व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक पदांच्या एकुण ३७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, पगार आणि निवड प्रक्रिया याबाबतची माहिती जाणून घेऊ या.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३
पदाचे नाव – वरिष्ठ अधिकारी, सहायक व्यवस्थापक/ व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक
एकूण पदसंख्या – ३७
नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
हेही वाचा- FTII पुणे येथे नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
अधिकृत वेबसाईट – http://www.hindustanpetroleum.com
शैक्षणिक पात्रता –
- वरिष्ठ अधिकारी – संबंधित क्षेत्रात Ph.D
- सहायक व्यवस्थापक/व्यवस्थापक – Ph.D./ M.E. / M. Tech.
- वरिष्ठ व्यवस्थापक – Ph.D./ M.E. / M. Tech.
- मुख्य व्यवस्थापक – Ph.D./ M.E. / M. Tech.
- उपमहाव्यवस्थापक – Ph.D./ M.E. / M. Tech.
पगार –
- वरिष्ठ अधिकारी – ६० हजार ते १ लाख ८० हजारांपर्यंत.
- सहायक व्यवस्थापक/व्यवस्थापक – ७० हजार ते २ लाख / ८० हजार ते २ लाख २० हजारांपर्यंत.
- वरिष्ठ व्यवस्थापक – ९० हजार ते २ लाख ४० हजारांपर्यंत.
- मुख्य व्यवस्थापक – १ लाख ते २ लाख ६० हजारांपर्यंत.
- उपमहाव्यवस्थापक – १ लाख २० हजार ते २ लाख ८० हजारांपर्यंत.
असा करा अर्ज –
भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ आहे.
ऊरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1G6A3JsqCqUtp-2gXq0ZKMfu9w3C7plJ2/view?usp=sharing) या लिंकवरील जाहिरात अवश्य वाचावी.