● हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ( HPCL), मुंबई (सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राईज) मध्ये इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक उमेदवारांची ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्सच्या एकूण ६३ पदांवर भरती.

(अजा – ९, अज – ४, इमाव – १७, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २७)

(१) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकल – ११ पदे. पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(२) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल – १७ पदे. पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(३) ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इन्स्ट्रूमेंटेशन – ६ पदे.

पात्रता – इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल/इन्स्ट्रूमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(४) केमिकल इंजिनीअर – १ पद.

पात्रता – केमिकल टेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग डिप्लोमा.

(५) ज्यु. एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी – २८ पदे.

पात्रता – सायन्स ग्रॅज्युएट आणि फायर अँड सेफ्टी डिप्लोमा.

डिप्लोमा अंतिम वर्षाचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

उमेदवारांनी इंजिनीअरिंग पदविका (३ वर्षं कालावधीचा पूर्ण वेळ) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण करणे आवश्यक. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांसाठी ५० टक्के गुण) (अनुभवी उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.)

वयोमर्यादा – (दि. ३० एप्रिल २०२५ रोजी) १८ ते २५ वर्षेपर्यंत.

वेतन श्रेणी – ३०,०००/- १,२०,०००/- अंदाजे वेतन रु. १०.५८ लाख प्रतिवर्ष. (सीटीसी)

निवड पद्धती – कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, ग्रुप टास्क/ग्रुप डिस्कशन, स्किल टेस्ट, पर्सोनल इंटरव्ह्यू

(ए) ऑब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटर बेस्ड् टेस्ट. (१) जनरल अॅप्टिट्यूड – इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड टेस्ट आणि इंटेलेक्चल पोटेंशियल टेस्ट (लॉजिकल रिझनिंग अँड डेटा इंटरप्रिटेशन); (२) टेक्निकल/प्रोफेशनल नॉलेज – अर्ज केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेवर आधारित प्रश्न. शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट आणि फिजिकल फिटनेस इफिशियन्सी टेस्ट ( PFET) साठी बोलाविले जाईल. PFET फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

(बी) कॉम्प्युटर बेस्ड् टेस्टमधील गुणवत्तेनुसार उमेदवारांना ग्रुप टास्क आणि पर्सोनल इंटरह्यूसाठी बोलाविले जाईल.

कॉम्प्युटर बेस्ड टेस्टसाठीचा अभ्यासक्रम, निवड पद्धती इ. विषयाची विस्तृत माहिती निवड प्रक्रिया सुरू होण्या अगोदर HPCL च्या वेबसाईटवर अपलोड केली जाईल.

निवडलेल्या उमेदवारांना १ वर्षाचा प्रोबेशन कालावधी असेल.

कामाचे ठिकाण – HPCL च्या रिफायनरी डिव्हीजन/सबसिडीअरीज/जॉईंट व्हेंचर किंवा भारत सरकारच्या कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये.

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/- रु. १८०/- जीएसटी. (अजा/अज/दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.)

शंकासमाधानासाठी careers@hpcl.in वर मेल करा. ऑनलाइन अर्ज http://www.hindustanpetroleum. com या संकेतस्थळावर दि. ३० एप्रिल २०२५ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.

suhaspatil237@gmail.com