बारावी हा आपल्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा असतो. बारावीमध्ये मिळालेल्या गुणांवरून आपण करिअरची पुढची दिशा ठरवतो, पण तुम्हाला जर बारावीमध्ये कमी गुण मिळाले असतील, तर टेन्शन घेऊ नका. कारण आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या.
१. जर तुम्हाला बारावीमध्ये कमी गुण मिळाले तर टेन्शन घेऊन नका. अशा वेळी तुमच्यासाठी कोणती बेस्ट करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत हे तपासा. सकारात्मक राहा आणि नकारात्मक विचार स्वत:पासून दूर करा.
२. बारावीत जरी कमी गुण मिळाले तरी काही प्रवेशपरीक्षा देऊन तुम्ही विविध कोर्सेस करू शकता किंवा पदवी घेऊ शकता.
हेही वाचा : HSC Result 2023 : बारावीनंतर लवकरात लवकर कमाई करू शकता; करा ‘हे’ पाच बेस्ट कोर्स
३. जर कमी गुण मिळाल्यामुळे तुम्हाला पहिल्या श्रेणीतील महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल तर तुम्ही दुसऱ्या श्रेणीतील महाविद्यालयांसाठी अर्ज करू शकता. दुसऱ्या श्रेणीतही चांगले महाविद्यालय तुम्हाला मिळू शकते.
४. जर तुम्हाला अपेक्षेपेक्षा खूप कमी गुण मिळाले असतील, तर तुम्ही पुन्हा परीक्षेसाठी तयारी करू शकता आणि चांगले गुण मिळवू शकता.
हेही वाचा : Maharashtra HSC Result 2023 Date : इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार, जाणून घ्या कसा आणि कुठे पाहता येईल
५. बारावीत कमी गुण मिळाल्यामुळे अनेकदा आपल्याला हवा तो कोर्स किंवा महाविद्यालय मिळेल का, याची भीती असते. पण कोर्स निवडताना तुमच्या अंतर्गत गुणांवर आधारित कोर्स निवडा. यामुळे तुम्हाला बारावीत गुण जरी कमी पडले तरी तुम्ही तो कोर्स करू शकता.
६. कमी गुण मिळाल्यामुळे सरकारी किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी तुम्ही खासगी कॉलेजमधून पाहिजे तो कोर्स करू शकता. महाविद्यालय हे सरकारी असो की खासगी, हे महत्त्वाचे नसून तुम्ही किती मेहनत घेता, हे महत्त्वाचे असते
(टीप : वरील लेख सामान्य निरीक्षणावर आधारीत आहे)