HURL Recruitment 2023 Registration Last Date: हिंदुस्थान उर्वरक अॅंड रसायन लिमिटेडमध्ये भरती होणार असल्याची माहिती काही महिन्यापूर्वी समोर आली होती. या भरतीद्वारे २३२ जागांसाठी योग्य उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. एचयूआरएचच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. २२ एप्रिल रोजी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जर या कंपनीमध्ये काम करायची इच्छा असूनही तुम्ही अर्ज भरुन पाठवला नसेल, तर आता अर्ज करण्यासाठी घाई करायला हवी. कारण उद्या म्हणजे १२ मे २०२३ रोजी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा शेवट होणार आहे.
एचयूआरएल द्वारे आयोजित करण्यात आलेल्या भरतीमध्ये कंपनीच्या वेगवेगळ्या विभागातील इंजिनीयर असिस्टंट, ज्यूनियर इंजिनीयर असिस्टंट, लॅब असिस्टंट, ज्यूनियर लॅब असिस्टंट, क्वालिटी असिस्टंट, ज्यूनियर अकाउंट असिस्टंट आणि स्टोअर असिस्टंट यांसारख्या २३२ रिक्त जागांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहे. विविध पदानुसार उमेदवाराच्या योग्यतेची तपासणी केली जाणार आहे. या संबंधित माहिती hurl.net.in. या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. या वेबसाइटवर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज देखील मिळवू शकतात. या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे वय ३० ते ३५ वर्ष असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया आणि वेतन
हिंदुस्थान उर्वरक अॅंड रसायन लिमिटेडमधील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना Computer Based Test म्हणजेच CBT परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर Trade test होईल. हे झाल्यावर कागदपत्रांची तपासणी केली जाईल आणि वैद्यकीय चाचणीला उमेदवारांना सामोरे जावे लागेल. यातून निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या अनुभवावरुन वेतन दिले जाईल. चांगल्या पदावर नियुक्ती झाल्यास वर्षाला चार ते साडेचार लाख रुपये पगार मिळू शकतो. वेतनाबाबतची माहितीदेखील वेबसाइटवर उपलब्ध आहे.