देशभरातील १२ वी उर्तीर्ण उमेदवारांना भारतीय हवाई दलात (IAF) ‘अग्नीवीर’ बनण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय वायुसेनेने नुकतीच अग्निवीरवायू भरती २०२३ ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यानुसार, अग्निवीरवायू भरतीसाठी १७ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. तर ऑनलाईन परीक्षा २० मे २०२३ रोजी होणार आहे. केवळ अविवाहित स्त्री आणि पुरुष उमेदवारांनाचं या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे.
अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://agnipathvayu.cdac.in/AV/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अग्निवायू भरतीसाठी पात्रता
विज्ञान शाखा
ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वीमध्ये विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित) आणि इंग्रजीत 50% गुण मिळवले आहेत ते अर्ज करू शकतात. किंवा उमेदवाराकडे तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका पदवी असावी. याशिवाय भौतिकशास्त्र आणि गणित यासारख्या विषयांसह २ वर्षांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात ५० % गुण असले पाहिजेत.
विज्ञान शाखेशिवाय कोणत्याही विषयात ५०% गुणांसह 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. पण इंग्रजी विषयात ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पात्र उमेदवारांचा जन्म २६ डिसेंबर २००२ ते २६ जून २००६ दरम्यान झालेला असावा. म्हणजेच वयोमर्यादा २१ वर्षांपेक्षा जास्त नसावी.
भरती कशी होणार?
पात्र अर्जदारांना प्रथम २० मे २०२३ रोजी होणार्या ऑनलाइन लेखी परीक्षेत बसावे लागेल. यानंतर शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.
अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्कर, वायुसेना आणि नौदलात अग्निवीरांची भरती ४ वर्षांसाठी असेल. चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर केवळ २५ टक्के अग्निवीरांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली जाईल. प्रशिक्षणादरम्यान, अग्निवीर भारतीय वायुसेना आणि भारतीय वायुसेनेच्या CSD कॅन्टीनचाही लाभ घेऊ शकतो. तसेच या अग्निवीरास ४८ लाख रुपयांचा वैद्यकीय विमा असेल. वर्षाला ३० दिवस सुटी मिळेल. याशिवाय आजारपणासाठीही रजेचा पर्यायही असेल.