How to Overcome Distractions during Studies: नियमित अभ्यास असो की स्पर्धा परिक्षेचा अभ्यास असो, अभ्यास करताना पटकन लक्ष विचलित होणे ही विदयार्थ्यांसाठी सामान्य समस्या आहे. अशा विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नाही, त्यांना काही लक्षात राहत नाही, विसरुन जातात, एकाग्रता नसते इत्यादी तक्रारी असतात. हे सर्व अभ्यास करताना लक्ष विचलित होण्यामुळे(Distractions during Studies) होते. हे टाळण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही टिप्स सांगितल्या आहे. देशातील अवघड परिक्षा IIT, IIM आणि UPSC CSEमध्ये यश मिळवणाऱ्या उत्तर प्रदेश विभागाच्या २०१३ बॅचची आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी दिलेल्या टिप्स वापरून विद्यार्थी आणि स्पर्धा परिक्षांचे उमेदवार आपला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकतात.
मोबाईलचा वापर किती करतो?
दर आठवड्याला तुम्ही किती वेळ मोबाईल फोन वापरता आणि कोणत्या ॲपवर किती वेळ वाया घालवता हे तपासा. कित्येकदा आपल्याला समजत नाही की तुम्ही मोबाईल ॲपवर किती वेळ वाया घालवत असता.
CGPDTM मध्ये ‘या’ पदासाठी होणार भरती, वयोमर्यादेपासून शेवटच्या तारखेपर्यंतचे जाणून घ्या महत्त्वाचे तपशील
अभ्यास करताना मोबाईल वापरणे बंद करा
अभ्यास करताना फोनचे इंटरनेट बंद करून स्वत:पासून दूर ठेवा. तुम्ही तो बंद करुन तुमच्या पालकांकडे किंवा मित्राकडे देऊ शकता. अभ्यास करताना काही महत्त्वाचे काही घडल्यास असेल तर तुमच्यापर्यंत निरोप पोहचेल.
फोनचे इंटरनेट ठराविक काळासाठी वापरण्यासाठी सेटिंग्ज बदला
IAS अधिकारी दिव्या मित्तल यांच्या मतानुसार, रोज किमान ६ तास फोनचे इंटरनेट बंद ठेवा आणि त्यासाठी कित्येक ॲप वापरता येऊ शकतात जे ठराविक काळासाठी फोनचा वापर प्रतिबंधित करू शकतात.
सकाळी अभ्यास करा
मोठ्या आवाजाचा गजर लावून, फोन किंवा घड्याळ तुमच्यापासून दूर ठेवा. कारण जेव्हा तुम्ही गजर बंद करण्यासाठी अंथरुणातून एकदा उठला की तुझी झोप मोड होईल. तुम्ही पुन्हा झोपण्याचा किंवा अभ्यास न करण्याचा निर्णय घेणार नाही. सकाळी सकाळी लवकर अभ्यास करणे चांगले असते विशेषत: यावेळी लक्ष केंद्रित करता येते
लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रत्येक सत्रानंतर १५ मिनिटांचा ब्रेक घ्या
अभ्यासादरम्यान ९० मिनिट/ २ तास लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्र ठरवा आणि प्रत्येक सत्रानंतर १५ मिनिटांचा ब्रेक घ्या. एकावेळी तुम्ही जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक सेशनसाठी तुम्हाला जोपर्यंत अलार्म वाजत नाही तोपर्यंत अभ्यासाशिवाय दुसरे काहीही करू नका.
त्राटक ध्यानाचा सराव करा
एकाग्रतेसाठी तुमच्या डोळ्यांनी एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करा. उदा. मेणबत्तीची ज्योत, भिंतीवर एखादा डाग यावर लक्ष केंद्रीत करू शकते.
बायनॉरल बीट्स
बायनॉरल बीट्स ऐकणे, जे ४० हर्ट्झचे ध्वनी कंपन आहेत, हे देखील मदत करु शकते. यामुळे लक्ष केंद्रित होते आणि एकाग्रता येण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. हे youtube वरून मिळू शकतात.
व्यायाम करा आणि घराबाहेर जा
घराबाहेर पडा आणि व्यायाम करा. रोज सकाळी किमान २० मिनिटे चालत जा. निसर्गाच्या जवळ जा, उद्यानात जा आणि फिरा/बसा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५-१० मिनिटांसाठीच सूर्यप्रकाश नक्कीच घ्या.
आहार
अभ्यास करताना आपण योग्य त्या पोषणाची काळजी घ्यायला विसरतो. संतुलित आहारामुळे लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. तसेच स्नॅक्स खाण्याची गरजही कमी होते.
हेही वाचा – UCILमध्ये जनरल मॅनेजरसह ‘या’ पदांसाठी भरती सुरु, १८ ऑगस्टपर्यंत करु शकता अर्ज
या सोप्या टिप्स असल्या तरी, काहीवेळा लहान गोष्टी वारंवार केल्या गेल्याने मोठा फरक पडतो.