Story Of IAS officer N Prasanth : आयएएस अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी असे प्रचंड अधिकार मिळतात. पण, कधीकधी त्यांना विविध कारणांमुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून कारवाईला सामोरे जावे लागते. तर आज आपण अशाच एका भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना गेल्या वर्षी कारवाईचा सामना करावा लागला. तर या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे एन प्रशांत.
एन प्रशांत २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत, यांना सोशल मीडियावर वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर टीका केल्याबद्दल नोव्हेंबर २०२४ पासून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी एन प्रशांत ‘कलेक्टर ब्रो’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी जोडण्याचा उपक्रम सुरू केला. येथूनच प्रशांत यांना ‘कलेक्टर ब्रो’ हे नाव मिळाले.
तीन पुस्तके लिहिली…
कोझिकोडचे जिल्हाधिकारी असताना एन प्रशांत त्यांच्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रचंड प्रसिद्ध होते. आयएएस प्रशांत कायदा क्षेत्रातील पदवीधर आहेत. त्यांनी तीन कलेक्टर ब्रो: द क्विक्सोटिक ‘थॅलल्स’ ऑफ अ सिव्हिल सर्व्हंट, लाइफ बॉय – द लिटल बुक ऑफ हॅपीनेस (संतोषथिंते कोचुपुस्तकम), आणि ब्रोस्वामी स्टोरीज आदी पुस्तके लिहिली आहेत.
तर एन प्रशांत यांनी यापूर्वी कोझिकोडचे जिल्हाधिकारी म्हणून इतर अनेक उच्च पदांवर काम केले आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांचे निलंबन होईपर्यंत त्यांनी कृषी विभागात विशेष सचिव म्हणून काम केले. पण, एन प्रशांत यांनी वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य सचिव ए जयथिलक यांच्यावर सोशल मीडियावर जाहीरपणे टीका केली, अनैतिक वर्तनाचा आरोप केला आणि याप्रसंगी त्यांना निलंबनाचा सामना करावा लागला.
गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ आयएएस अधिकारी ए. जयतिलक यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्यामुळे एन प्रशांत तर आयएएस अधिकारी के गोपालकृष्णन यांना सरकारी अधिकाऱ्यांसाठी धर्म आधारित व्हॉट्सॲप ग्रुप तयार केल्याप्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले.
© IE Online Media Services (P) Ltd