IAS Vandana Meena : हजारो तरुण तरुणी दरवर्षी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अनेक जण आयएएस, आयपीएस बनण्याचे स्वप्न पाहतात. काही लोकांचे स्वप्न पूर्ण होते तर काही लोकांचे स्वप्न हे स्वप्नच राहते. काही लोक तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतात. काही लोक कोचिंग लावतात तर काही लोक नोट्सच्या मदतीने अभ्यास करतात. पण काही लोक स्वत: अभ्यास करूनपरीक्षेत पास होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज आपण एका अशा तरुणीविषयी जाणून घेणार आहोत जिने कोणतेही कोचिंग क्लासेस न लावता यूट्युब बघून युपीएससीचा अभ्यास केला आहे आणि तिचे आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. (IAS Vandana Meena cracked UPSC who studied 15-16 hours by watching youtube video daily read success story)

या तरुणीचे नाव आहे वंदना मीणा. वंदना मीणा ही मूळची राजस्थानच्या माधोपूर गावी राहणारी तरुणी. काही वर्षांपूर्वी तिचे आईवडील गावात राहिल्यानंतर दिल्ली शहरात आले. तिचे वडील पृथ्वीराज मीणा हे दिल्ली पोलीसमध्ये कार्यरत आहे. अशात वंदना सुद्धा तिच्या आईवडिलांबरोबर आल्याने तिचे पुढील शिक्षण सुद्धा दिल्लीमधूनच झाले.

वंदनाने तिचे शालेय शिक्षण दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेतून पूर्ण केले त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला आणि गणित विषयामध्ये पदवी मिळवली. पदवीधर वंदनाने यूपीएससी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू केली . विशेष म्हणजे तिने कोणतेही कोचिंग लावले नाही. घरी अभ्यास केला.
एका मुलाखतीत वंदना सांगते घरात सरकारी नोकरीचे वातावरण होते त्यामुळे यूपीएससी करण्याचा विचार केला. तिने घरीच युट्यूबवरून यूपीएससी परीक्षा संबंधित विषयाचा अभ्यास केला. याशिवाय ऑनलाइन पुस्तके मागवली. शेवटी याच मेहनतीच्या जोरावर २०२१ मध्ये वंदनाला यूपीएससी परीक्षेत यश मिळाले.

वंदनाने ३३० वी रँक मिळवली आणि आयएएस बनली. वंदना सांगते की ती दररोज १५ ते १६ तास अभ्यास करायची. तिच्या मते यूपीएससी साठी कोणताही शॉर्टकट नाही. वंदनाने आज दाखवून दिले की प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. गरीबीमुळे कोचिंग न लावणाऱ्या पण आएएस आणि आयपीएस बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांसाठी वंदनाचा हा प्रवास प्रेरणा देणारा आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias vandana meena cracked upsc who studied 15 16 hours by watching youtube video daily read success story ndj