द इंडियन इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) प्रोबेशनरी ऑफिसर्स/मॅनेजमेंट ट्रेनी (CRP PO/MT 2023) आणि स्पेशलिस्ट ऑफिसर्स (IBPS SO 2023) यांच्या निवडीसाठी सामायिक भरती प्रक्रियेसाठी अर्ज नोंदणीची अंतिम तारीख २८ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. उमेदवार https://ibps.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात
आगामी IBPS PO परीक्षांसाठी प्रवेशपत्रे किंवा कॉल लेटर्स सप्टेंबर २०२३मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे तर SO परीक्षेसाठी प्रवेशपत्रे डिसेंबरमध्ये जाहीर केले जातील. PO/MT साठी ऑनलाइन प्राथमिक परीक्षा सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये तात्पुरती नियोजित आहे, तर SO परीक्षा डिसेंबरमध्ये होणे अपेक्षित आहे.
आयबीपीएस पीओ आणि एसओ २०२३ भरती २०२३ अर्ज शुल्क :
SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी रु. १७५/- आहे, तर इतर सर्व उमेदवारांसाठी ते रु ८५०/- आहे.
आयबीपीएस स्पेशल ऑफिसर २०२ साठी उपलब्ध असलेल्या रिक्त जागा १४०२ आहेत आणि त्यामध्ये आयटी ऑफिसर(स्केल-I), अॅग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर (स्केल-I), राजभाषा अधिकारी (स्केल-I),लॉ ऑफिसर (स्केल-I), एचआर/पर्सोनल ऑफिसर (स्केल-I), आणि मार्केटिंग ऑफिसर (स्केल-I) सारख्या पदांचा समावेश आहे.
आयबीपीएस पीओ आणि एसओ २०२३ भरती २०२३: रिक्त जागा तपशील
- आयटी ऑफिसर(स्केल-I)- १२०
- अॅग्रिकल्चर फिल्ड ऑफिसर (स्केल-I) – ५०० पदे
- लॉ ऑफिसर (स्केल-I) -१०पदे
- एचआर/पर्सोनल ऑफिसर (स्केल-I) -३१ पदे
- मार्केटिंग ऑफिसर (स्केल-I) – ७०० पदे
- मार्केटिंग ऑफिसर (स्केल-I) – ४१ पदे
आयबीपीएस पीओ आणि एसओ २०२३ भरती २०२३ मुदत वाढीची अधिसुचना -https://www.ibps.in/wp-content/uploads/PO_SPL_Corrigendum-for-extension.pdf
आयबीपीएस एसओ २०२३ साठी थेट अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/
आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर २०२३ थेट अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/
हेही वाचा- IBPBमध्ये स्पेशल आणि प्रोबेशनरी ऑफिसरची भरती, जाणून घ्या वयोमर्यादा अन् पात्रता निकष
आयपबीएस पीओ आणि एसओ २०२३ साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा
- IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – ibps.in.
- होम पेजवर “IBPS PO 2023” आणि “IBPS SO 2023” भरती लिंक पहा.
- तुम्ही ज्या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिता त्या संबंधित लिंकवर क्लिक करा.
- पात्रता निकष, आरक्षण धोरण आणि रिक्त जागा काळजीपूर्वक वाचा.
- “ऑनलाइन अर्ज करा” बटणावर क्लिक करा आणि अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, निश्चीत तारखांमध्ये अर्ज फी भरा आणि फॉर्म सबमिट करा