इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (The Institute of Banking Personnel Selection) म्हणजेच आयबीपीएस (IBPS) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेचा उद्देश गट “A” अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “ब” कार्यालयीन सहाय्यकची नियुक्ती करणे हा आहे. प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि लिपिक यांसारख्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही भरती मोहीम एक उत्तम संधी आहे.ही अधिसूचना काल ७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना IBPS RRB लिपिक आणि अधिकारी पदांसाठी अर्ज करायचा आहे ते आयबीपीएसच्या (IBPS) अधिकृत वेबसाइट ibps.in वर अर्ज करू शकतात.

IBPS Recruitment 2024 : भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

IBPS Recruitment 2024 : रिक्त पदे आणि पदसंख्या

या भरती मोहिमेद्वारे गट “A” – अधिकारी (स्केल-I, II आणि III) आणि गट “B” – कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) च्या ९९२३ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे.

IBPS Recruitment 2024 : वयोमर्यदा

अधिकारी स्केल १ (सहाय्यक व्यवस्थापक) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षे यादरम्यान असावे.
ऑफिस असिस्टंट (लिपिक) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षे असावे.
अधिकारी स्केल-२ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३२ वर्षे असावे.
अधिकारी स्केल-३ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ४०वर्षे असावे.

IBPS Recruitment 2024 : निवड प्रक्रिया

उमेदवारांच्या सर्व पदांसाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेमध्ये प्राथमिक परीक्षा आणि त्यानंतर मुख्य परीक्षा यांचा समावेश आहे.पण,अधिकारी (स्केल-I, II आणि III) च्या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत सुद्धा घेतली जाईल.

IBPS Recruitment 2024 : अर्ज फी

अर्ज फी सर्वांसाठी ८५० रुपये आहे. तर एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांनी अधिकारी (स्केल I, II आणि III) साठी अर्ज करताना १७५ रुपये फी असणार आहे. अर्जशुल्क जीएसटीसह असणार आहे.

हेही वाचा…UPSC Recruitment 2024: युपीएसएसी अंतर्गत ‘या’ ३२२ जागांवर होणार भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

IBPS Recruitment 2024 : महत्वाच्या तारखा

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ७ जून २०२४ पासूनच सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ जून २०२४ असणार आहे.
पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) साठी कॉल लेटर डाउनलोड करण्याची तारीख १ जुलै २०२४ असणार आहे.
पूर्व परीक्षा प्रशिक्षण (पीईटी) आयोजित करण्यात येणार आहे त्याची तारीख २२ जुलै २०२४ ते २७ जुलै २०२४ असणार आहे.

IBPS Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

विविध पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचनेतून शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी.

लिंक – https://ibps.in/wp-content/uploads/CRP_RRBs_XIII_notification_6.6.24.pdf

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी.