IBPS RRB Recruitment 2023: इंस्टीट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने रिजनल रुरल बँकेत भरती २०२३साठी नोंदणीकरिता अतिंम मुदत वाढवण्यात आली आहे. इच्छूक उमेदवार आता २८ जून २०२३ पर्यंत आयबीपीएस आरआरबी भरतीसाठी अर्ज करू शकता. ज्या उमेदवारांना आतापर्यंत या भरतीसाठी अर्ज केलेला नाही ते आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाईटवर ibps.in वर भेट देऊन ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयबीपीएस आर आर बी भरतीकरिता नोंदणीसाठी शेवटची तारीख वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मणिपुर राज्याची स्थिती सावधगिरीने पुनरावलोकन करण्यासाठी आणि देशाच्या काही भागांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर उपलब्ध अधिकृत नोटीसनुसार, अर्जाची लिंक आणि अर्ज शुल्क भरण्यासाठी विंडो २८ जून २०२३ पर्यंत सुरू राहील. या भरतीमोहिमेंतर्गत ८००० पेक्षा जास्त जागांसाठी ऑफिसर (स्केल-I, II आणि III) आणि ऑफिस अस्टिसंटची ( मल्टीपर्पज) भरती केली जाईल.

हेही वाचा – रेल्वेत नोकरीची मोठी संधी! अप्रेंटीस ट्रेनी पदांसाठी भरती सुरु, कोण करू शकते अर्ज, जाणून घ्या

IBPS RRB Recruitment 2023: असा करा अर्ज

स्‍टेप १: आईबीपीएसच्या आधिकारिक वेबसाइटला ibps.in भेट द्या.
स्‍टेप २: होमपेजवर उपलब्ध आईबीपीएस आरआरबी भरतीसाठी लिंकवर क्लिक करा.
स्‍टेप ३: आता ऑफिसर स्केल I, II आणि ऑफिस असिस्‍टंट लिंकवर क्लिक करा.
स्‍टेप ४: आपली रजिस्‍ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा आणि अर्जाचा फॉर्म भरा.
स्‍टेप ५: पूर्ण फॉर्म भरल्यानंतर सबमिट क्लिक करा.
स्‍टेप ६: अर्जाचे शुल्क भरा आणि फायनल सबमिट करू शकता.

हेही वाचा – IBPS मध्ये मेगाभरती, तब्बल ८६०० जागांसाठी भरती सुरु, जाणून घ्या कसा करावा अर्ज

अधिकृत अधिसुचना – https://www.ibps.in/wp-content/uploads/Corrigendum-for-extension_21.06.23.pdf

फॉर्म भरल्यानंतर, उमेदवाराने कन्फर्मेशन पेज डाउनलोड करावे आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवावी. अनारक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. ८५०/ आहे, तर राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु.१७५/- आहे. इतर कोणतीही माहिती मिळविण्यासाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ibps rrb po recruitment 2023 for officer scale i ii and iii 8612 post registration date extended till june 28 apply at ibps in snk
Show comments