IBPS SO Recruitment 2024: राष्ट्रीय बँकांमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि आयबीपीएस एसओ परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने विविध क्षेत्रांतील बँकांमध्ये एकूण ८८४ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र अधिकारी रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्यावी लागेल. या भरतीसाठी तुम्ही २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता. तर आता या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

IBPS SO Recruitment 2024: रिक्त पदे व पदसंख्या

या भरती अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर्सच्या ८८४ (स्केल १) रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

१. कृषी क्षेत्र अधिकारी : ३४६ रिक्त जागा

२. HR/कार्मिक अधिकारी : २५ जागा

३. आयटी अधिकारी : १७० जागा

४. कायदा अधिकारी : १२५ जागा

५. विपणन अधिकारी : २०५ जागा

६. राजभाषा अधिकारी : १३ जागा

हेही वाचा…NABARD Recruitment 2024: तरुणांना सरकारी नोकरीची संधी! नाबार्डमध्ये ‘या’ पदाच्या १०२ जागांसाठी भरती सुरु ; आजच करा अर्ज

IBPS SO Recruitment 2024: महत्वाच्या तारखा…

IBPS SO Recruitment 2024: वयोमर्यादा

१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्जदाराचे वय किमान २० वर्षे आणि ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. याचा अर्थ उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९४ पूर्वी नसावा आणि १ ऑगस्ट २००४ नंतर झालेला नसावा.

IBPS SO Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे; ती उमेदवाराने तपासून घ्यावी. लिंक – https://www.ibps.in/wp-content/uploads/Detailed-Advt.-CRP-SPL-XIV_final-1.pdf

IBPS SO Recruitment 2024 : अर्ज फी :

अर्ज फी एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी १७५ रुपये आणि इतर उमेदवारांसाठी ८५० रुपये असणार आहे.

IBPS SO Recruitment 2024 : महत्त्वाची सूचना

ज्या उमेदवारांनी CIBIL स्टेटस जॉईन होण्यापूर्वी अपडेट केला नाही, त्यांना एकतर CIBIL स्टेटस अपडेट करावा लागेल किंवा CIBIL मध्ये अकाउंटच्या संदर्भात NOCs सादर करावे लागतील. जर या गोष्टी करण्यात उमेदवार अपयशी ठरला, तर ऑफर मागे किंवा रद्द केली जाऊ शकते. या संदर्भात अंतिम निर्णय हा वाटप केलेल्या बँकेकडे राहील; असे IBPS ने म्हटले आहे.

तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून उमेदवाराने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ibps the institute of banking personnel selection has started the online application process for 884 scale 1 officer vacancies for specialist officers asp