ICAI CA Foundation Result 2023-2024 Date Time: द इंस्टीट्यूट ऑफ अकाउंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे आज ७ फेब्रुवारी रोजी चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) फाउंडेशनच्या डिसेंबर-जानेवारी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे. संस्थेच्या अधिकृत वेबसाइट icai.nic.in ला भेट देऊन उमेदवार निकाल तपासू शकतात. घोषित झाल्यावर, उमेदवार नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर वापरून त्यांचे निकालपत्र डाउनलोड करू शकतात.
“डिसेंबर २०२३/जानेवारी२०२४ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स फाउंडेशन परीक्षांचे निकाल बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि उमेदवारांना icai.nic.in या वेबसाइटवर ते पाहता येईल. याची नोंद घ्यावे की, वर नमूद केलेल्या वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी उमेदवाराला त्याचा/तिचा नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. त्याच्या/तिच्या रोल नंबरसह,” असे ICAI ने सांगितले.
हेही वाचा – IAF Agniveervayu Recruitment 2024 : अग्निवीर वायू भरतीसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ, लवकर करा अर्ज
आयसीएआय सीए फाउंडेशनचा (ICAI CA Foundation Result 2023 direct link) –
- https://icai.nic.in/caresult/
सीए फाउंडेशन २०२३ निकाल (ICAI CA Foundation Result 2023): परीक्षा कुठे झाली?
आयसीएआय सीए फाउंडेशनची परीक्षा ३१ डिसेंबर २०२३, २,४ आणि ६ जानेवारी २०२४ रोजी झाली. ज्या उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला आहे ते एकदा निकालाची लिंक सक्रिय झाल्यानंतर वेबसाइटवर त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतील.
हेही वाचा – महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात होणार मोठी भरती! वैद्यकीय अधिकारी पदाच्या १७२९ जागांसाठी करू शकता अर्ज
आयसीएआय सीए फाउंडेशन निकाल डिसेंबर सत्र २०२३ (ICAI CA Foundation Result December Session 2023) : निकालपत्र कसे डाउनलोड करावे
ICAI च्या अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर भेट द्या.
मुख्य पानावर “सीए फाउंडेशन 2023 डिसेंबर सत्राचा निकाल” लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
नवीन विंडो दिसेल त्यात प्रवेश केल्यावर तुमची लॉगिन क्रेडेन्शियल्स टाका आणि नंतर “सबमिट” बटणावर क्लिक करा.
स्क्रीन डिसेंबर २०२३ साठी ICAI CA फाउंडेशन निकाल सादर करेल.
तुमच्या CA फाउंडेशनच्या निकाला पाहा आणि निकालपत्र डाउनलोड करा.