ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024 : केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या अंतर्गत (ICAR) नोकरी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ईमेलद्वारे अर्ज पाठवायचा आहे. तसेच या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा असल्यास, तुम्ही अधिकृत वेबसाइटला https://circot.icar.gov.in/ सुद्धा भेट देऊ शकता. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, मुंबई भरती २०२४ साठी आयोजित केलेल्या मुलाखतीची तारीख, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिक्त पद व पदसंख्या – यंग प्रोफेशनल I (YP) पदाच्या दोन रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता – अर्ज करणाऱ्या उमेदवाराने डिप्लोमा / टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी / टेक्स्टाईल केमिस्ट्रीमध्ये पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्षांपर्यंत असावे.

अर्ज कसा करावा?

अर्ज भरून, तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये २२ मे २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी संध्याकाळी ५ च्या आधी सर्व संबंधित कागदपत्रांसह senthilcricrot@gmail.com वर ईमेलद्वारे पाठवावा.

तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड २७ मे रोजी मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

हेही वाचा…TISS recruitment 2024: मुंबई येथील ‘टीआयएसएस’मध्ये नोकरी करण्याची संधी; ७५ हजार रुपयांपर्यंत मिळणार वेतन, आजच करा अर्ज

मुलाखतीचा पत्ता- उमेदवारांना “ICAR-CIRCOT, अडेनवाला रोड, पाच गार्डन्सजवळ, माटुंगा, मुंबई-४०० ०१” या पत्त्यावर मुलाखत देण्यासाठी जावे लागेल.

पगार- निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला ३० हजार रुपये पगार मिळणार आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी अधिकृत सूचना एकदा तपासून घ्यावी…

लिंक – https://circot.icar.gov.in/sites/default/files/Advertisement%2007.05.2024.pdf

उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icar central institute for research on cotton technology invited application for young professional i job location mumbai asp