ICAR-NBSSLUP recruitment 2024 : भारतीय कृषी संशोधन परिषद, नागपूर येथे ‘यंग प्रोफेशनल’ या रिक्त पदावर भरती होणार आहे. या पदावर नोकरीचा अर्ज पाठविण्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा काय आहे जाणून घ्या. तसेच, अर्जाची अंतिम तारीख काय आहे याची माहिती इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या.
ICAR-NBSSLUP recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
आयटी विभागातील यंग प्रोफेशनल-II या पदासाठी एक जागा रिक्त आहे.
ICAR-NBSSLUP recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
आयटी विभागातील यंग प्रोफेशनल-II या पदासाठी नोकरीचा अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांकडे पुढील पदवी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्समधील पदव्युत्तर पदवी असावी.
अथवा - उमेदवाराकडे संगणक विज्ञान/संगणक तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञानामधील बॅचलर पदवी असावी.
ICAR-NBSSLUP recruitment 2024 : वेतन
आयटी विभागातील यंग प्रोफेशनल-II या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ४२,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.
ICAR-NBSSLUP recruitment 2024 – भारतीय कृषी संशोधन परिषद अधिकृत वेबसाईट –
https://nbsslup.icar.gov.in/
ICAR-NBSSLUP recruitment 2024 – अधिसूचना –
https://nbsslup.icar.gov.in/wp-content/uploads/2024/Recruitment/Recruit_AKMU_03042024.pdf
ICAR-NBSSLUP recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वर नमूद केलेल्या पदावर नोकरीचा अर्ज करायचा असल्यास तो ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी खालील पत्ता पाहा.
मुलाखतीचा पत्ता : ICAR-राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरो, अमरावती रोड, नागपूर- ४४००३३.
अर्ज आणि मुलाखतीसाठी उमेदवारांचे वय हे २१ ते ४५ वर्षांमधील असणे आवश्यक आहे.
मुलाखतीसाठी जाताना उमेदवाराने आपली सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.
नोकरीचा अर्ज भरण्याआधी अथवा मुलाखतीला जाण्याआधी वरील पदासंबंधी माहिती अधिसूचनेमध्ये वाचावी.
आयटी विभागातील यंग प्रोफेशनल-II या पदासंबंधी अतिरिक्त माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीसंबंधी अधिसूचना वाचावी. वेबसाइट, तसेच अधिसूचनेची लिंक वर नमूद केली आहे.