भारतीय तटरक्षक दलांतर्गत असिस्टंट कमांडंट पदाच्या काही जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४६ पदे भरण्यात येणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय तटरक्षक दल २०२३ भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय तटरक्षक दल भरती २०२३
पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट
एकूण रिक्त पदे – ४६
पदाचे नाव ब्रांच रिक्त पदे –
पदाचे नाव | ब्रांच | रिक्त पदे |
जनरल ड्यूटी (GD)/ कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) | २५ | |
असिस्टंट कमांडंट (02/2024 बॅच) | टेक्निकल (मेकॅनिकल)/ टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) | २० |
लॉ एन्ट्री | १ |
शैक्षणिक पात्रता –
जनरल ड्यूटी (GD) – ५५ टक्के गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह पदवीधर.
कमर्शियल पायलट लायसन्स – ५५ टक्के गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह १२ वी पास + CPL (Commercial Pilot License).
टेक्निकल (मेकॅनिकल) –
५५ टक्के गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस विषयात इंजिनिरिंग पदवी
टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) –
५५ टक्के गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिरिंग पदवी.
हेही वाचा- पदवीधरांना आयकर विभागात नोकरीची मोठी संधी; तरुण व्यावसायिक पदासाठी भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर
लॉ एन्ट्री – ६० टक्के गुणांसह LLB.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
- ओबीसी – ३ वर्षांची सूट
- मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट
अर्ज फी – कोणतीही फी नाही.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १ सप्टेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ सप्टेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1BBhs_K46m6_r8nyk3Uld6Gh77101f95u/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.