ICMR-NIRRCH recruitment 2024 : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था येथे वैद्यकीय शास्त्रज्ञ C [Scientist ‘C’ (Medical)] या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी एकूण किती जागा रिक्त आहेत ते पाहा. तसेच या नोकरीसाठी अर्ज करण्याचे पात्रता निकष, वयोमर्यादा आणि वेतन या सर्व गोष्टी जाणून घ्या.
ICMR-NIRRCH recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेअंतर्गत होणाऱ्या वैद्यकीय शास्त्रज्ञ C या पदासाठी केवळ एक जागा भरण्यात येणार आहे.
ICMR-NIRRCH recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय शास्त्रज्ञ C पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पुढील शिक्षण आवश्यक आहे –
उमेदवारांकडे एमबीबीएसची पदवी असावी अथवा उमेदवाराकडे पब्लिक हेल्थ या क्षेत्रातील मास्टर्स आणि एमबीबीएसचे शिक्षण असावे / पब्लिक हेल्थमध्ये पीएचडी असावी.
अथवा, एमबीबीएससह कम्युनिटी मेडिसिन्समध्ये पदव्युत्तर, म्हणजेच एमडी [MD] चे शिक्षण असणे आवश्यक आहे.
ICMR-NIRRCH recruitment 2024 : वेतन
वैद्यकीय शास्त्रज्ञ C पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास, ६७,०००/- रुपये + ८%HRA देण्यात येणार आहे.
ICMR-NIRRCH recruitment 2024 – राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था अधिकृत वेबसाईट लिंक
https://nirrch.res.in/
ICMR-NIRRCH recruitment 2024 – नोकरीची अधिसूचना
https://nirrch.res.in/wp-content/uploads/2024/04/Advt-Dr-RG-MRHRUVANI-Online_15-05-2024.pdf
ICMR-NIRRCH recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वैद्यकीय शास्त्रज्ञ C या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ४० वर्षांपर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
नोकरीचा अर्ज पाठविताना उमेदवारांनी आपली अचूक आणि आवश्यक माहिती द्यावी.
अर्जासह आवश्यक असल्यास महत्त्वाची कागदपत्रे जोडावी.
उमेदवारांनी नोकरीचा अर्ज पाठविण्याआधी, नोकरीची अधिसूचना व्यवस्थित वाचून, समजून घ्यावी.
वरील नोकरीचा अर्ज इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेआधी पाठविणे आवश्यक आहे.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही १५ मे २०२४ अशी आहे.
वरील नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास, उमेदवारांनी राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेची अधिकृत वेबसाइट पाहावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.