IDBI Bank Bharti 2024: हल्ली तरुण मंडळी नोकरीच्या शोधात असतात. जर तुम्हाला बँकींग क्षेत्रात आवड असेल आणि तुम्ही बँकेत नोकरी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण IDBI बँक अंतर्गत काही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बँकीग क्षेत्रात करीअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारासाठी ही सुवर्ण संधी आहे. इच्छुक उमेदवार वेळ न घालवता लगेच अर्ज करू शकतात. कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, किती जागांसाठी भरती आहे, अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आणि किती पगार मिळणार, याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदाचे नाव – IDBI बँक अंतर्गत खालील तीन पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

  • उपमहाव्यवस्थापक
  • सहायक महाव्यवस्थापक
  • व्यवस्थापक

पदसंख्या – IDBI बँक अंतर्गत एकुण ३१ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तीन पदांनुसार या जागांचे विभाजन करण्यात आले आहेत.

  • उपमहाव्यवस्थापक – ०३
  • सहायक महाव्यवस्थापक – १५
  • व्यवस्थापक – १३

हेही वाचा : यूपीएससी सूत्र : लोकसभेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष पद अन् अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने केलेली अटक, वाचा सविस्तर…

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिसुचना नीट वाचावी.

नोकरी ठिकाण – पात्र उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण मुंबई राहील.

वयोमर्यादा – २५ – ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती – तुम्ही या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे. त्यामुळे त्यापूर्वी अर्ज करा अन्यथा तुमचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

वेतन – खालील पदांसाठी वेतन खालील प्रमाणे-

उपमहाव्यवस्थापक – १,९०,००० रुपये/-
सहायक महाव्यवस्थापक – १,५७,००० रुपये/-
व्यवस्थापक – १,१९,००० रुपये/-

हेही वाचा : Success Story : मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडली, एका घटनेनं बदललं आयुष्य; वाचा आरामदायी प्रवास सेवा पुरविणाऱ्या ओला कंपनीच्या संस्थापकाची गोष्ट

अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली वेबसाइटवर क्लिक करा.

https://www.idbibank.in/

अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी खालील अधिसुचना नीट वाचावी. अधिसुचना वाचल्याशिवाय अर्ज भरू नये.

Click to access Detailed-Advt-Spl-2024-25-phase-II-31.pdf

अर्ज कसा करावा?

  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
  • अर्जामध्ये विचारलेली माहिती पूर्ण भरावी. अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात घेता अर्ज भरावा.
  • आवश्यक कागदपत्रे नीट जोडावी.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idbi bank bharti 2024 31 vacancies for the post of deputy general manager assistant general manager manager ndj