IDBI Bank Recruitment 2025 : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आयडीबीआय बँकेत तब्बल ६५० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी ही भरती होणार आहे, या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया १ मार्चपासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवार http://www.idbibank.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. (IDBI Bank Recruitment)

पदाचे नाव व तपशील

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (PGDBF) – ६५० रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी असणे आवश्यक आहे. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेत एससी, एसटी उमेदवारांना ५ वर्ष तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाते.

परीक्षा शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये भरावे लागणार आहे.

निवड कशी होईल?

निवड प्रक्रियेत उमेदवाराची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. या ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ऑनलाइन टेस्ट आणि मुलाखतीत पास झाल्यावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

महत्वाच्या लिंक्स

आयडीबीआय बँक भरतीसंदर्भातील पीडीएफ

idbibank.in/pdf

अर्ज करण्यासाठी लिंक

idbi-bank-careers

अधिकृत वेबसाईट

idbi-bank

Story img Loader