इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अंतर्गत उमेदवारांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाच्या ५०० जागांसाठी भरती होणार आहे. या पदासंबंधीच्या अर्जाची प्रक्रिया १२ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ फेब्रुवारी असेल. इच्छुक उमेदवार http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
IDBI Recruitment 2024 : वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २५ वर्षे यादरम्यान असावे.
IDBI Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे.
IDBI Recruitment 2024 : निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांची ऑनलाइन चाचणी घेतली जाईल. त्यानंतर त्या चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. तसेच ऑनलाइन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह (Objective) प्रकारची असेल.
IDBI Recruitment 2024 : अर्ज शुल्क
SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २०० रुपये असेल. तर, इतर वर्गांतील उमेदवारांसाठी एक हजार रुपये अर्ज शुल्क असेल.
अर्ज करण्याची प्रक्रिया :
सगळ्यात पहिला http://www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवर जा आणि करिअर लिंकवर क्लिक करा.
पुढे करंट ओपनिंग्सवर क्लिक करा.
JAM 2024 भरती टॅबअंतर्गत अर्ज लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.
उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म भरा.
अर्ज शुल्क भरा.
तिथे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.अर्ज जमा (Submit) करा.
संदर्भासाठी या फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्या. अशा प्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.