IDBI Bank Recruitment 2024: IDBI बँकेने “अर्धवेळ बँकेचे वैद्यकीय अधिकारी ” च्या एकूण १८ पदांसाठी भरतीची सुचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी खाली दिलेल्या पत्त्याद्वारे ऑफलाइन अर्ज करू शकतात. ऑफलाइन अर्जाची शेवटची तारीख ०७ मार्च २०२४ असावी. IDBI बँकेची अधिकृत वेबसाइट http://www.idbibank.in आहे.
IDBI Bank Recruitment 2024 रिक्त जागा २०२४(IDBI Bank Vacancy 2024 )
या भरती मोहिमअंतर्गत अर्धवेळ बँकेचे वैद्यकीय अधिकारी पदासाठी एकूण १८ जागांची भरती केली जाणार आहे.
अधिसुचना- https://www.idbibank.in/pdf/careers/Detailed-Advertisement-BMO-February-07-2024.PDF
IDBI Bank Recruitment 2024 साठी शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For IDBI Bank MO Recruitment 2024)
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिनमध्ये मान्यता प्राप्त, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/कॉलेजमधून एमबीबीएस/एमडी. एमडी-मेडिसिन पदवी असलेल्या अर्जदाराला प्राधान्य दिले जाईल.
IDBI Bank Recruitment 2024 वेतन तपशील (Salary Details For IDBI Mumbai Notification 2024 )
अर्धवेळ बँकेचे वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १००० रुपये प्रति तास मानधन मिळेल आणि २००० रुपये प्रति महिना वाहतूक भत्ता मिळेल.
हेही वाचा- ESIS Pune Recruitment 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत भरती सुरू; पाहा अधिक माहिती….
IDBI Bank Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा (How To Apply For IDBI Mumbai Application 2024)
या पदासाठी इच्छूक उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०२४ आहे. मुदत संपण्यापूर्वी अर्ज करावा.