IDBI Bank SCO Recruitment 2025:  बँकिंगच्या क्षेत्रात नोकरी मिळविण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक तरुण प्रयत्नदेखील करीत असतात. इच्छुक उमेदवारांन बँकेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. चला तर मग जाणून घेऊ भरती प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा.

आयडीबीआय बँकेत मेगा भरती निघालीये. आयडीबीआय बँकेने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदासाठी एकूण ११९ रिक्त जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांना बँकेमध्ये नोकरी करण्याची आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. जे उमेदवार या पदासाठी पात्र आणि इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आयडीबीआय बँकेने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (एससीओ) या पदांसाठी पात्रता निकष असलेले उमेदवार आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यासाठी आयडीबीआय बँक ७ एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू करीत आहे.

आयडीबीआय बँकेच्या या भरती मोहिमेद्वारे एकूण ११९ पदे भरली जाणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० एप्रिलपर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील मुद्दे काळजीपूर्वक वाचावेत.

आयडीबीआय बँकेत कोणती पदे नियुक्त केली जाणार?

उपमहाव्यवस्थापक (डीजीएम) ग्रेड ड– ८ पदे
असिस्टंट जनरल मॅनेजर (एजीएम) ग्रेड सी– ४२ पदे
मॅनेजर ग्रेड बी– ६९ पदे

आयडीबीआय बँकेत नोकरी मिळविण्यासाठी पात्रता निकष

आयडीबीआय बँकेच्या वेगवेगळ्या विभागांमधील वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ- वित्त आणि लेखा विभागातील उपमहाव्यवस्थापक पदासाठी उमेदवारांकडे सीए किंवा एमबीए (वित्त) पदवी असणे आवश्यक आहे आणि बीएफएसआयमध्ये अधिकारी किंवा समकक्ष म्हणून किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे, त्यात सात वर्षे संबंधित कामामध्ये असावे.

त्याच वेळी कायदेशीर विभागात सहायक महाव्यवस्थापक पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे आणि कायदा अधिकारी म्हणून किमान सात वर्षांचा अनुभव किंवा प्रॅक्टिसिंग अ‍ॅडव्होकेट म्हणून किमान चार वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

आयडीबीआय बँकेच्या या भरतीसाठी या पदांसाठी अर्ज करण्याची योजना आखणाऱ्या कोणालाही अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क किती?

सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- रु. १०५०
एससी/एसटी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- २५० रुपये
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, आयएमपीएस किंवा मोबाईल वॉलेटद्वारे पेमेंट करता येते.

सूचना येथे पाहा

आयडीबीआय बँक भरती २०२५ ची अधिसूचना Recruitment-of-Spl-Officer-2025-26.pdf

कशी होणार निवड ?

उमेदवारांची निवड बहुस्तरीय प्रक्रियेद्वारे केली जाईल. (वय, पात्रता, अनुभव इत्यादींवर आधारित) त्यानंतर
कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना गट चर्चा आणि/किंवा वैयक्तिक मुलाखतीसाठी (PI) बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.