IDBI Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण झाली आहे, कारण आयडीबीआय बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना दर महिना तब्बल एक लाख ५७ हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. उमेदवार आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

रिक्त पदे आणि तपशील

रिक्त पदे : एकूण ५६

Job Opportunity, Central Government Job, Job,
केंद्र सरकारच्या ‘या’ विभागांमध्ये नोकरीची संधी, २३ नोव्हेंबरपर्यंत…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
Career mantra MPSC Graduation STUDY FOR COMPETITIVE EXAMINATION job
करिअर मंत्र
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
prime minister internship scheme
‘PM Internship Scheme’ काय आहे? योजनेसाठी पात्रता काय? बेरोजगार तरुणांना या योजनेचा कसा मिळणार लाभ?
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार

आयडीबीआय बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. यात असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सीच्या २५ आणि मॅनेजर ग्रेड बीच्या ३१ पदांसाठी भरती जाहीर केली आहे, अशा एकूण ५६ जागा भरल्या जाणार आहेत.

यात जनरल कॅटेगरीतील उमेदवारांसाठी २५ जागा, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १४ जागा, एससी आणि एसटी उमेदवारांसाठी ९ जागा आणि ईडब्‍ल्‍यूएससाठी (आर्थिक मागास) ५ जागा राखीव आहेत.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २५ ते ४० दरम्यान असावे.

शैक्षणिक पात्रता

कॉर्पोरेट क्रेडिट रिटेल बँकिंगच्या असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. तसेच एमबीए डिग्री असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल. या पदासाठी किमान सात वर्षे काम केल्याचा अनुभव गरजेचा आहे.

मॅनेजर बी ग्रेड पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून डिग्री घेतलेली असावी, उमेदवाराकडे किमान चार वर्षे कामाचा अनुभव असावा.

निवड प्रक्रिया

आयडीबीआय बँकेत भरतीसाठी मुलाखत आणि ग्रुप डिस्कशननंतर उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

पगार किती असेल?

आयडीबीआय बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर ग्रेड सी या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला १,०५, २८० रुपये मासिक वेतन दिले जाईल, याच पदासाठी मेट्रो शहरांसाठी निवड झाल्यास उमेदवारास १,५७,००० रुपये वेतन असेल. यानंतर मॅनेजर ग्रेड बी पदासाठी उमेदवारांना महिन्याला ९३,९६० रुपये वेतन असेल, तर मेट्रो शहरात निवड झाल्यास हाच पगार १,१९,०० रुपये असेल.

आयडीबीआय बँक भरती अधिकृत जाहिरात
https://www.idbibank.in/pdf/careers/