IGI Aviation recruitment 2024 : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत सध्या ‘ग्राहक सेवा एजंट’ या रिक्त पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. एकूण किती पदांवर भरती होईल पाहा. तसेच इच्छुक उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष आणि अर्जाची अंतिम तारीख या सर्वांबद्दल दिलेली माहिती पाहा.

IGI Aviation recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

ग्राहक सेवा एजंट या पदासाठी एकूण – १०७४ जागा रिक्त आहेत.

DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Venkatesh Iyer Completed His MBA and Now Pursuing PhD in Finance
IPL 2025: आयपीएल लिलावात २३ कोटींपेक्षा जास्त बोली अन् आता होणार डॉक्टर, कोण आहे हा खेळाडू?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
Ramshej Fort Conservation, Shivkarya Gadkot Sanstha Campaign, Ramshej Fort,
नाशिक : रामशेज किल्ला संवर्धनार्थ अशी ही धडपड, शिवकार्य गडकोट संस्थेची श्रमदान मोहीम
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?

IGI Aviation recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

ग्राहक सेवा एजंट या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे पुढील शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी तसेच बारावीचे शिक्षण घेतलेले असावे. [दहावी+१२वी]

IGI Aviation recruitment 2024 : वेतन

ग्राहक सेवा एजंट या पदावर भरती झालेल्या उमेदवारास दरमहा २५,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.

हेही वाचा : SBI recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी! भरतीबद्दल माहिती पाहा

IGI Aviation recruitment 2024 – IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अधिकृत वेबसाईट –
https://igiaviationdelhi.com/

IGI Aviation recruitment 2024 – अधिसूचना –
https://igiaviationdelhi.com/wp-content/uploads/2024/03/IGI-English-Adv-2024.pdf

IGI Aviation recruitment 2024 : अर्ज प्रक्रिया

ग्राहक सेवा एजंट या पदावर काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून केवळ ऑनलाइन अर्ज भरावा.
तसेच नोकरीचा अर्ज भरताना सर्व माहिती योग्य ठिकाणी आणि अचूक भरावी. माहिती चुकीची भरल्यास किंवा अयोग्य ठिकाणी भरल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
या पदावर उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे, त्यामुळे लेखी परीक्षेबद्दल थोडी माहिती पाहा.

IGI Aviation recruitment 2024 : लेखी परीक्षा प्रक्रिया

इच्छुक उमेदवारास नोकरीसाठी पात्र होण्याकरिता प्रथम लेखी परीक्षेला बसावे लागेल.
जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील त्यांना कंपनीच्या दिल्लीतील नोंदणीकृत कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल.
उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या एकत्रित कामगिरीच्या आधारित असेल.
परीक्षा ही हिंदी/इंग्रजी भाषेत असेल.
एकूण १०० मार्कांची ही लेखी परीक्षा असेल.

ग्राहक सेवा एजंट पदाच्या नोकरीसंदर्भात किंवा लेखी परीक्षेबद्दल उमेदवारास कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाईट तसेच अधिसूचना यांची लिंक वर नमूद केली आहे.

Story img Loader