IIIT Nagpur recruitment 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. नोकरीसाठी अर्ज कसा आणि कुठे भरावा याबद्दल इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या. तसेच, नोकरीचा अर्ज पाठविण्यासाठीचे पात्रता निकष आणि शैक्षणिक पात्रता काय आहे पाहा.
IIIT Nagpur recruitment 2024 : पद आणि पदसंख्या
संगणक विज्ञान [कम्प्युटर सायन्स] आणि अभियांत्रिकी या पदासाठी एकूण ९ जागांवर भरती करण्यात येणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी या पदांसाठी एकूण २ जागांवर भरती करण्यात येणार आहे.
IIIT Nagpur recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
संगणक विज्ञान [कम्प्युटर सायन्स] आणि अभियांत्रिकी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे, पीएच.डी. / एम.टेक. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या दोन्हीमध्ये बी.टेक. आणि एम.टेक. या क्षेत्रात प्रथम श्रेणीतील शिक्षण असावे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पीएच.डी. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी यांमध्ये बी.टेक. आणि एम.टेक. क्षेत्रातील प्रथम श्रेणीतील शिक्षण असावे.
IIIT Nagpur recruitment 2024 : वेतन
संगणक विज्ञान [कम्प्युटर सायन्स] आणि अभियांत्रिकी या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना ६० ते ६५ हजार रुपयांचे वेतन देण्यात येईल.
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना ६० ते ६५ हजार रुपयांचे वेतन देण्यात येईल.
IIIT Nagpur recruitment 2024 – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.iiitn.ac.in/
IIIT Nagpur recruitment 2024 – अधिसूचना –
https://iiitn.ac.in/Downloads/recruitments/2024/april/AAP-%202024-25%20-%20Recruitment.pdf
IIIT Nagpur recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया
वरील कोणत्याही पदासाठी उमेदवारांना अर्ज करायचा असल्यास त्यांनी तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि योग्य माहिती भरणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी अर्ज करण्याआधी नोकरीची अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी.
उमेदवारांनी नोकरीसाठीचे अर्ज अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे.
नोकरीचे अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही १५ मे २०२४ अशी आहे.
वर नमूद केलेल्या कोणत्याही पदासंबंधी उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.