IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत वित्त आणि लेखा व्यवस्थापक [Manager Finance & Accounts] या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी कुणी अर्ज करावा, अर्जासाठी पात्रता निकष आणि शैक्षणिक पात्रता काय आहे हे जाणून घ्या. तसेच, उमेदवारांची निवड झाल्यावर त्यांना वेतन किती असेल याबद्दलदेखील माहिती पाहा.

IIM Mumbai recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये, वित्त आणि लेखा व्यवस्थापक या पदासाठी एक जागा भरण्यात येणार आहे.

job opportunities in konkan railways recruitment in state bank of india
नोकरीची संधी : स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरती
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ie thinc fourth edition
‘हवामान बदल थोपवण्यासाठी निधीची गरज’
job Opportunity recruitment in State Bank of India career news
नोकरीची संधी: स्टेट बँक ऑफ इंडियातील संधि
dnyanaradha multistate cooperative society case ED raids in Delhi Jalgaon and Ahmedabad
ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरण : ईडीकडून दिल्ली, जळगाव व अहमदाबादमध्ये छापे
nmmc removed illegal hoarding in navi mumbai
नवी मुंबई : बेकायदा फलकबाजीवर पालिकेची कारवाई; २ हजार ५१६ फलक हटवले
delhi society notice viral
Notice for Bachelors: बॅचलर्ससाठी दिल्लीतील सोसायटीची नोटीस; “एवढे पार्सल मागवू नका, फारतर १ किंवा २…”, नेमकं घडलं काय?
asiatic society mumbai news
मुंबई: “२२० वर्ष जुनी एशियाटिक सोसायटी ताब्यात घ्या”, कर्मचाऱ्यांची मोदी सरकारकडे मागणी!

IIM Mumbai recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वित्त आणि लेखा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स ऑफ इंडिया यांसारख्या संस्थांमधून CA/CMA ची व्यावसायिक पात्रता असलेली पदवी असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : IIIT Nagpur recruitment 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे नोकरीची संधी! माहिती पाहा

IIM Mumbai recruitment 2024 : वेतन

वित्त आणि लेखा व्यवस्थापक पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर, त्यास ६७,७००/- रुपये पगार देण्यात येईल.

IIM Mumbai recruitment 2024 – इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अधिकृत वेबसाईट
https://iimmumbai.ac.in/

IIM Mumbai recruitment 2024 – अधिसूचना –
https://iimmumbai.ac.in/storage/uploads/careers/2232/171300685140.pdf

IIM Mumbai recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदाच्या नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी नोकरीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ४५ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
नोकरीचा अर्ज करताना उमेदवारांनी अर्जात आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
उमेदवारांनी सदर अर्ज हा अंतिम तारखेआधी पाठवणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख ४ मे २०२४ अशी आहे.

वित्त आणि लेखा व्यवस्थापक या पदासंबंधी उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.