IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये ‘व्यवस्थापक – वित्त आणि लेखा’ [Manager Finance & Accounts] या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी नोकरीचा अर्ज कुणी आणि कसा करायचा याची इच्छुक उमेदवारांनी माहिती पाहा. तसेच अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय आहे हेदखील जाणून घ्या.

IIM Mumbai recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

व्यवस्थापक वित्त आणि लेखा या पदासाठी एका जागेवर भरती करण्यात येणार आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

IIM Mumbai recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वित्त आणि लेखा व्यवस्थापक पदासाठी उमेदवाराकडे पुढीलप्रमाणे शिक्षण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराकडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंट्स ऑफ इंडियामधून CA/CMA/ ची व्यावसायिक पात्रता असलेली पदवी असणे आवश्यक आहे.

NIOH recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

IIM Mumbai recruitment 2024 : वेतन

वित्त आणि लेखा व्यवस्थापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ६७,७००/- रुपये इतके वेतन देण्यात येईल.

IIM Mumbai recruitment 2024 – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अधिकृत वेबसाईट –
https://iimmumbai.ac.in/

IIM Mumbai recruitment 2024 – अधिसूचना –
https://iimmumbai.ac.in/storage/uploads/careers/2232/171300685140.pdf

IIM Mumbai recruitment 2024 – अर्जाची लिंक –
https://iimmumbai.ac.in/administrative_recruitment/

IIM Mumbai recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज भरताना उमेदवारांनी आपली संपूर्ण आणि योग्य माहिती भरणे अपेक्षित आहे.
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ‘४५ वर्षे’ अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज हा उमेदवारांनी अंतिम तारखेआधी भरावा.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही ४ मे २०२४ अशी आहे.

वित्त आणि लेखा व्यवस्थापक या पदासंबंधी नोकरीचा अर्ज पाठविण्याआधी, नोकरीसंबंधी अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीसंबंधी अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना यांची लिंक वर नमूद केली आहे.

Story img Loader