Indian Meteorological Department Recruitment 2024: भारतीय हवामान विभागात द्वारे भरती केली जाणार आहे. या भरती मोहीमेअंतर्गत एकूण ७२ जागा भरल्या जाती ज्यामध्ये “प्रोजेक्ट सायंटिस्ट २’, प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘१’ या पदांचा समावेश आहे. या भरती संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारा शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ०१ मार्च २०२४ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

IMD Recruitment 2024: पदाचा तपशील

या भरती मोहीमेअंतर्गत “प्रोजेक्ट सायंटिस्ट २’साठी ३४ पदे आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘१’ साठी ३८ पदे अशी एकूण ७२ पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदराकडे पदानुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

हेही वाचा – MahaTransco Bharti 2024: महापारेषणमध्ये १३० पदांसाठी होणार भरती! ‘ही’ आहे शेवटची तारीख, त्वरित अर्ज करा

IMD Recruitment 2024 वयोमर्यादा

“प्रोजेक्ट सायंटिस्ट २ पदाकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय ४० वर्ष असावे.
प्रोजेक्ट सायंटिस्ट पदाकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय ३५ वर्षे असावे

IMD Recruitment 2024 : अधिकृत वेबसाईट – https://mausam.imd.gov.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी थेट लिंक – https://vacancies.incois.gov.in/jobs/imd0124/home.jsp
IMD Recruitment 2024 : अधिसुचना – https://internal.imd.gov.in/recruits/20240209_rec_147.pdf

IMD Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

प्रोजेक्ट सायंटिस्ट २ या पदासाठी पात्र उमेदवराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र किंवा गणित किंवा हवामानशास्त्र(Meteorology)किंवा वायुमंडलीय विज्ञान (Atmospheric Science) किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमधील एम.एस्सी पदवी असावी आणि किमान ६०% गुणांसह उतीर्ण असावे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून वर नमूद केलेल्या विषयात बी.टेक. / B.E. ही पदवी असावी आणि किमान ६०% गुणांसह उतीर्ण असावे.

हेही वाचा – AIESL Recruitment 2024 : एयर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी १०० रिक्त जागांची होणार भरती!

प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘१ या पदासाठी अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातूनभौतिकशास्त्र किंवा गणित किंवा हवामानशास्त्र किंवा वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कॉम्प्युटर अॅप्लिकेश किंवा कॉप्युटर सायन्स यातील एम.एस्सी. पदवी असावी आणि किमान ६०% गुणांनी उतीर्ण असावे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून वर नमूद केलेल्या विषयात बी.टेक. / बी. ई पदवी असावी आणि किमान ६०% गुणांसह उतीर्ण असावे.

IMD Recruitment 2024 वेतनश्रेणी

प्रोजेक्ट सायंटिस्ट २ पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारास ६७००० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
प्रोजेक्ट सायंटिस्ट २ पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारास ५६००० रुपये पर्यंत पगार मिळू शकतो.