प्रा.रवींद्र कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ही भारतीय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र परिवर्तन करणारी एक नवी प्रणाली घडत होती, याचा आता सर्वांना विश्वास निर्माण होत होता. भारतभरातील विविध राज्ये हे धोरण स्वीकारत होती. NEP मध्ये जी अपेक्षा व्यक्त केली होती ती अपेक्षा आता फलद्रूप होण्याची चिन्हे दिसू लागली होती.

रमेश सर गुजरातमधील NEP-2020 च्या अंमलबजावणीविषयी माहिती देत होते. ते पुढे सांगू लागले, ‘‘विद्यार्थी प्रथम विषयाच्या शेवटी (नैसर्गिक आणि भौतिक विज्ञान, गणित, सांख्यिकी, आणि संगणकीय विज्ञान, ग्रंथालय, माहिती आणि माध्यम विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, आणि मानवता आणि सामाजिक विज्ञान) त्यांच्या त्यांच्या मुख्य विषयाच्या परिसरातील विषयांमध्ये उपलब्ध असलेले विषय बदल म्हणून निवडू शकतात.’’

‘‘२४/३२ श्रेयांकांचे एकल किंवा आंतरविद्याशाखीय उपविषयांचे (वैकल्पिक) अभ्यासक्रम अतिशय विशिष्ट किंवा विशेष किंवा प्रगत किंवा अभ्यासशिस्तीच्या विषयाला समर्थन देणारे आहेत किंवा विस्तारित व्याप्ती प्रदान करणारे आहेत. ते इतर काही अभ्यासविषय किंवा डोमेनशी सक्षम असा संपर्क साधू शकतात आणि विद्यार्थ्यांचा कौशल्यविकास करू शकतात. ही कौशल्ये एकसमान किंवा अन्य अभ्यासविषयांशी निगडित असू शकतात. उपविषयांच्या एकूण श्रेयांकांपैकी ५० टक्के श्रेयांक हे संबंधित विषयापैकी किंवा ते विषय ज्या अभ्यासशाखेतील असतात त्यामधील असणे गरजेचे आहे. एकूण श्रेयांकांपैकी आणखी ५० टक्के विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कोणत्याही शाखेतून मिळवता उपविषयांपैकी ३ अभ्यासक्रम (१२ श्रेयांक) हे मुख्य किंवा उपविषय किंवा विद्यार्थ्याच्या निवडीशी संबंधित असतील. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय कौशल्य पात्रता चौकटीशी समकक्ष असायला हवेत.’’

महेश सरांनी विचारलं, ‘‘सर यासंदर्भात आणखी कोणत्या गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत?’’

रमेश सरांनी सांगितलं, ‘‘उच्च शिक्षण संस्थांच्या स्तरावर काही निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यापैकी महत्त्वाचा निर्देश म्हणजे, उच्च शिक्षण संस्थांनी श्रेयांकांच्या आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा व त्यांना पूरक अशा व्यवस्था निर्माण केल्या पाहिजेत.

या जोडीने आणखी काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहाता येतील. उदाहरणार्थ,

विद्यार्थी एकतर एखादी संस्था निवडू शकतो किंवा तो/ती संस्थांच्या यादीवर आधारित दुसऱ्या संस्थेत जाऊ शकतो जिथून विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार पदवी घेऊ शकतील

उच्च शिक्षण संस्थांनी विविध विद्याशाखांमधील अभ्यासक्रमांना जोडण्यासाठी तसेच मुख्य/ उपविषय/ आंतरविद्याशाखीय/ बहुविद्याशाखीय/ AEC/ SEC/ VAC/ IKS/ व्यावसायिक या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या श्रेणी अंतर्गत विषयांमध्ये संगती निर्माण करण्यासाठी काही व्यवस्था निर्माण केली पाहिजे. विषय आणि त्यांना ऑफर करणे आवश्यक आहे जे एकल शिस्त किंवा बहु-विषय (दोन किंवा अधिक शिस्तांचे संयोजन) असू शकतात. विशिष्ट अभ्यासक्रम. विद्यार्थी उपलब्ध अभ्यासक्रमांमधून अभ्यासक्रम निवडू शकतात किंवा इतर कोणत्याही संस्थेत जाऊन अभ्यास करू शकतील

प्रथम आणि द्वितीय वर्षातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन यंत्रणा आणि प्रमाणन यंत्रणा यांचा विकास

विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विद्याशाखेशी निगडित अशा उद्याोगसमूहांशी शिक्षुता व प्रशिक्षुता यासाठी करार

अद्यायावत उपकरणांसह व्यावहारिक प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि आयसीटी-आधारित वर्गांची संस्थेच्याच कॅम्पसमध्ये किंवा इतर संस्थांच्या सहकार्याने उपलब्धता करून देणे

अॅकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी

शिक्षकांनी किमान एका नवीन क्षेत्रात IKS, भाषा, व्यावसायिक अभ्यासक्रम, मूल्यवर्धित अभ्यासक्रम, क्षमता वृद्धिंगत अभ्यासक्रम, आणि कौशल्य संवर्धन अभ्यासक्रमांत प्रावीण्य मिळवण्याची गरज’’

प्रा. रमेश सरांनी सांगितलं, ‘‘गुजरात राज्याने आपली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची अशा प्रकारे तयारी केली आहे.’’

सुशील सरांनी विचारलं, ‘‘सर हे गुजरात राज्याबद्दल झालं. अन्य राज्यांत काय सुरू आहे?’’

रमेश सर उत्तरले, ‘‘सुशील सर, अतिपूर्वेकडील राज्यांमध्ये आसाम सरकारने मे २०२३ मध्ये सुधारित UG आणि PG अभ्यासक्रम फ्रेमवर्क लाँच केले आहे. त्याचा अमंलबजावणीसाठी निवडलेला आराखडा आपल्याला आता सांगतो.

१. आसाममधील संलग्न विद्यापीठे ही विद्यापीठ अनुदान आयोगाने डिसेंबर २०२२ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाचा आराखडा विकसित करतील. हे करत असताना NHEQF अंतर्गत दिलेल्या निकाल-आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जाईल.

२. आसाममधील राज्य विद्यापीठे किमान शिक्षण कालावधी, परीक्षा आणि मूल्यमापन कालावधी, उन्हाळी प्रशिक्षण आणि अभ्यासक्रमाच्या क्रियाकलापांचे तपशीलवार शैक्षणिक दिनदर्शिका आखतील.

३. विद्यापीठे त्यांच्या वैधानिक संस्थांद्वारे SEC आणि VAC अभ्यासक्रमांसाठी एक जोड अभ्यासक्रम विकसित करतील. या अभ्यासक्रमांची रचना शिक्षण परिणामासह केली जाईल आणि ABC द्वारे त्याचे मॅपिंग हाती घेतले जाईल. पहिल्या/ दुसऱ्या वर्षानंतर बाहेर पडण्याचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यात शिक्षुता (इंटर्नशिप) / प्रशिक्षुता (अप्रेंटिसशिप) अनिवार्य असेल.

४. सत्र एक आणि दोनसाठी विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांमधील अभ्यासक्रम निवडतील. हे अभ्यासक्रम विस्तृत आणि प्रास्ताविक स्वरूपाचे असतील

५. सत्र तीन आणि चारसाठी विद्यार्थी मुख्य आणि उपविषयांची निवड करतील. ही निवड करताना ते त्यांची विविधांगी कौशल्ये वाढवण्यासाठी ते भाषा आणि व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम निवडतील.

६. सत्र पाच आणि सहा साठी निवडलेल्या मेजर आणि मायनरमधील उच्च-स्तरीय अभ्यासक्रमांचा सखोल बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय समज प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. व्यावहारिक कौशल्ये मिळविण्यासाठी विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमही निवडू शकतील

७. सत्र सात आणि आठसाठी विद्यार्थी त्यांनी यापूर्वी निवडलेल्या मुख्य किंवा उपविषयाचा प्रगत स्तरावर अभ्यास करू शकतील.

८. सत्र सात आणि आठ मध्ये त्यांना जर संशोधनासह ऑनर्स पदवी मिळवायची असेल तर त्यांना संशोधन पदवी, संशोधन पद्धती आणि संशोधन प्रकल्पासह मुख्य किंवा उपविषयाचा प्रगत स्तरावर अभ्यास करता येईल. संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय संशोधन पायाभूत सुविधा असलेल्या इतर संस्थांमध्ये संशोधन कार्य करण्याची परवानगी देण्यात आली आहे.’’

रमेश सर सांगत होते, ‘‘आसामने स्वीकारलेल्या धोरणानुसार विद्यार्थी हे संशोधनासह पदवी मिळवण्यासाठी थोडे वेगळे कष्ट घेतील. या विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्य किंवा उपविषयामध्ये जर पुढे शिक्षण घ्यायचं असेल, तर त्या त्या विषयांचे अध्ययन केल्यानंतर दिसून येणारे शैक्षणिक परिणाम, विषयाची काठीण्य पातळी आणि शैक्षणिक कठोरता यावर आधारित एक सांकेतिक ( CODE) संरचना केली आहे. ही रचना शून्य ते आठशे या अंकांच्या सारणीत बसवली आहे.’’

रमेश सरांनी सांकेतिक संरचना समजावून द्यायला प्रारंभ केला:

i. ०-९९: प्रारंभिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले पूर्व-आवश्यक अभ्यासक्रम जे कोणतेही श्रेयांक आवश्यक नसलेले उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होण्याची फारशी गरज नसलेले जोड (ब्रिज) अभ्यासक्रम असतील. हे ब्रिज कोर्सेस विद्यामान अनौपचारिक पद्धतीच्या अभ्यासक्रमांची जागा घेतील. असे अभ्यासक्रम काही महाविद्यालये अथवा विद्यापीठांमध्ये चालवले जातील.

ii. १००-१९९: विद्यार्थ्यांना विषयांबद्दल समज आणि मूलभूत ज्ञान मिळवण्यासाठी आणि आवडीचा विषय किंवा शिस्त निश्चित करण्यात मदत करण्याच्या उद्देशाने निर्माण केले गेलेले फाउंडेशन किंवा प्राथमिक अभ्यासक्रम असतील. हे अभ्यासक्रम मुख्य विषयातील अभ्यासक्रमांसाठी देखील आवश्यक असू शकतील

iii. २००-२९९ : या स्तरावर विषय-विशिष्ट अभ्यासक्रमांसह इंटरमीजिएटस्त रीय अभ्यासक्रम तयार केले जातील. ह्यांचा उद्देश हा मुख्य वा उपविषयांच्या श्रेयांकांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी असेल. अशा अभ्यासक्रमांची रचना करताना ते मुख्य वा उपविषयांची निवड करत असताना त्यांच्या निवडपूर्व अभ्यासक्रमांचा भाग बनू शकतील.

iv. ३००-३९९ : विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यासाठी तयार केलेले उच्च-स्तरीय अभ्यासक्रम या स्तरावर येतात. हे मुख्य विषयाच्या अभ्यासशाखेचा किंवा आंतरविद्याशाखीय अभ्यासासाठी आवश्यक असतील.

५. ४००-४९९ : या स्तरावरील प्रगत अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना पदवीसाठी किंवा पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षांसाठी व्यावहारिक पाया असलेले, चर्चासत्राधारित अभ्यासक्रम, सत्रांत परीक्षा, संशोधन कार्यपद्धती, प्रगत प्रयोगशाळांमधील प्रत्यक्ष प्रयोग, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, संशोधन प्रकल्प, प्रत्यक्ष कार्यानुभव (हँड्स-ऑन-ट्रेनिंग), शिक्षुता किंवा प्रशिक्षुता, प्रकल्पाधारित कार्याचा समावेश असेल.

vi. ५००-५९९: या स्तरावर २ वर्षांच्या पदव्युत्तर पदवी कार्यक्रमासाठी प्रथम वर्षाच्या पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांचा समावेश होतो

vii. ६००-६९९ : १-वर्षाच्या मास्टर पदवी कार्यक्रमाचा किंवा दोन वर्षांच्या मास्टर्स पदवी अभ्यासक्रमांचा या स्तरावर समावेश होतो.

्र्र्र ५. ७०० -७९९: आणि वरील अभ्यासक्रम हे विद्यावाचस्पती किंवा डॉक्टरेट मिळवू पाहात असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच केवळ आहेत.

अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Implementation in gujarat national education policy radical transformation in indian education system amy
Show comments