यूपीएससी व्यक्तिमत्त्व चाचणीचा अर्ज भरताना छंद, आवडी-निवडी, क्रीडा, पारितोषिके आदींची माहिती भरताना अनेक गोष्टींचे भान राखायला हवे. खूप तपशीलही आणि अगदीच नेमकेपणा यातला सुवर्णमध्य गाठता यायला हवा. खूप जनरल लिहिलं तर मुलाखतीत काहीही प्रश्न विचारले जाण्याच्या शक्यता असतात..

मागच्या लेखात आपण DAF2 मध्ये काय काय माहिती द्यावी लागते हे सविस्तरपणे पाहिलं. हा DAF2 भरताना काय गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कुठच्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आजच्या लेखात आपण पाहूया. DAF2 मधला पारितोषिके व scholarship, क्रीडा / NCC, नेतृत्व गुण, छंद, अॅक्टिव्हिटी या भागाबद्दल पाहूया. या सेक्शन मध्ये खूप जास्त मुद्दे म्हणजे अगदी चौथीची/ सातवीची स्कॉलरशिप, आठवीत शाळेत पहिला क्रमांक असे तपशील लिहू नयेत. आपण वरिष्ठ अधिकारी होण्यासाठी ही परीक्षा देत असल्याने खूप सारे तपशील लिहिण्याची गरज नसते. महाराष्ट्र टॅलेंट सर्च किंवा नॅशनल टॅलेंट सर्च यासारख्या परीक्षांबद्दल लिहायला हरकत नाही किंवा पदवी,पदव्युत्तर शिक्षणात सुवर्णपदक, रौप्यपदक, कांस्यपदक मिळालं असेल तर त्याबद्दल लिहावं. स्पोर्ट्सच्या क्षेत्रात काहीच केलेलं नसेल तर त्या सेक्शनमध्ये काय लिहायचं असा प्रश्न अनेक उमेदवार विचारतात. काही केलंच नसेल तर उगाच काहीतरी आव आणून खोटी माहिती लिहू नये. त्या सेक्शनमध्ये स्पोर्ट्स, NCC, NSS, स्काऊट आणि गाईड बद्दल लिहिता येतं. शाळेत किंवा कॉलेजमध्ये तुम्ही कुठच्या क्लबचे अध्यक्ष किंवा सदस्य असाल तर त्याबद्दल नेतृत्वगुणाच्या सेक्शनमध्ये लिहू शकता. रक्तदान शिबीर किंवा मेडिकल कॅम्प यासारख्या उपक्रमात भाग घेतला असेल तर त्याबद्दल लिहू शकता.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “कधी कधी काही घटना घडतात, पण…”; मुंबईत सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Saif Ali Khan attacker identified says police
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या
8th Pay Commission Approved by By Government
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मोदी सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…

हेही वाचा >>> फक्त १० हजार रुपयांच्या कर्जाने सुरू केलं काम, आता आहे कोटींचं साम्राज्य; वाचा कोणता व्यवसाय करतात कमल खुशलानी

छंद, आवड या सेक्शनमध्ये ३ ते ४ तपशील खूप आहेत. याही भागात अनेकवेळा उमेदवार खूप जास्त स्पेसिफिक गोष्टी लिहितात किंवा खूप जनरल पण लिहितात. उदाहरण बघूया वाचन ही जर एखाद्या उमेदवाराची आवड असेल तर? वाचन एवढंच लिहिलं तर काय होणार? मराठी की इंग्रजी की हिंदी? असा प्रश्न उभा राहणार. मग कुठच्या प्रकारचं वाचन? कथा, कादंबरी, कविता, सायफाय? या मध्ये अनेकवेळा मराठी विद्यार्थी मराठी निसर्ग कविता किंवा संत वाङ्मय वाचायला आवडतं असं खूपच नेमकं लिहितात. आणखी एक उदाहरण बघू. ट्रेकिंगची आवड असेल एखाद्या उमेदवाराला तर नुसतं ट्रेकिंग लिहावं कि सह्याद्री मध्ये ट्रेकिंग किंवा हिमालयात ट्रेकिंग असं लिहावं? हा निर्णय खरंतर त्या उमेदवारालाच घ्यावा लागतो.

खूप जनरल लिहिलं तर काहीही प्रश्न विचारले जाण्याच्या शक्यता असतात. आपण एखाद्या विषयाची किती तपशीलवार तयारी करू शकतो याचा विचार करून या भागात मुद्दे लिहिले पाहिजेत. एखाद्या उमेदवाराने हिमालयात कधीच ट्रेकिंग केलेलं नसेल तर त्याने सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग हे लिहिणं केव्हाही उत्तम. किंवा वाचनाची आवड असणाऱ्या उमेदवाराने फक्त एखाद्याच लेखकाची पुस्तकं वाचली असतील तर वाचन ही आवड म्हणून लिहिणं थोडं धोकादायक होऊ शकतं कारण तुम्हाला एकाच लेखकाची पुस्तकं वाचायला आवडतात, बाकी कोणी आवडत नाही का असे प्रश्न विचारले जाऊ शकतात.

मुलाखतीत DAF 2 मधील 14 ( a) ( b) ( c) ( d) या सेक्शनमध्ये दिलेली माहिती हे मुलाखती दरम्यान तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रामाणिकपणाची चाचणी घेणारे असू शकते. एखाद्या क्रीडा प्रकाराविषयी तुम्हाला जुजबी माहिती असेल आणि त्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवले अस नमूद केले तर अतिशय सखोल आणि चतुरस्त्र असा अभ्यास त्याविषयी अपेक्षित आहे. उत्तर देता न आल्यास आपला हिरमोड होऊन पुढील मुलाखतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बरेचदा विद्यार्थी क्रिकेट पहाणे छंद म्हणून नमूद करतात मग त्याविषयी अद्यावत माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरण म्हणजे नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर टेस्ट सिरीज मध्ये खेळाव्यतिरिक्त काय घडले असा प्रश्न या वर्षीच्या UPSC च्या personality test मध्ये विचारला गेला. रोहित शर्माचे संघात नसणे, बुमराहचे दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडणे, सुनील गावस्कर समालोचक म्हणून सीमारेषेवर असताना त्यांच्या हस्ते त्यांच नाव असलेला करंडक खेळाडूला न देत एक प्रकारे त्यांचा अपमान करणे असे अनेक मुद्दे उत्तरात अपेक्षित होते.

थोडक्यात काय तर तुम्ही या सदरात कमीत कमी माहिती प्रामाणिकपणे नमूद करत त्याचा चौफेर अभ्यास करावा म्हणजे मुलाखतीत यश हे तुमचेच आहे.

(महेश मुरलीधर भागवत तेलंगणचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत)

mmbips@gmail.com

(सुप्रिया देवस्थळी या संयुक्त महालेखा नियंत्रक, ICAS आहेत)

supsdk@gmail.com

Story img Loader