Income Tax Department Bharti 2025: आयकर विभाग (Income Tax Department) हा विविध प्रत्यक्ष कर कायद्याची अंमलबजावणी करतो. भारत सरकारसाठी महसूल गोळा करण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असते. हे विभाग सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या नेतृत्वाखाली काम करते. आयकर विभागत नोकरी करायची अनेकांची इच्छा असते. जर तुम्ही सुद्धा त्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
आयकर विभाग अंतर्गत “स्टेनोग्राफर ग्रेड-I“ या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या पदाच्या एकूण ५७ रिक्त जागेसाठी ही भरती आहे. पदांनुसार पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तुम्ही जर पदासाठी इच्छुक असाल तर संधीचे सोने करू शकता. अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, किती पगार असणार इत्यादी माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
अर्ज मागविण्यात पदाचे नाव
पदाचे नाव व पदसंख्या – स्टेनोग्राफर ग्रेड-I या पदासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. एकुण ५७ जागांसाठी ही भरती आहे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .त्यासाठी अधिसुचना नीट वाचावी.
वयोमर्यादा – वयाच्या ५६ वर्षापर्यंत कोणीही या पदासाठी अर्ज करू शकतात.
अर्ज पद्धत – हा अर्ज तुम्ही ऑफलाइन पद्धतीने करू शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – “प्रधान मुख्य आयकर आयुक्त, ओडिशा प्रदेश, आयकर भवन, राजस्व विहार, भुवनेश्वर-751007” या पत्त्यावर अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – या पदासाठी तुम्ही ६ जून २०२५ पर्यंत अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट – http://www.tnincometax.gov.in
अधिसुचना – https://incometaxindia.gov.in/Lists/Recruitment%20Notices/Attachments/197/Filling-up-of-vacancies-in-the-grade-of-Stenographer-Grade-I-on-deputation-basis.pdf
वेतनश्रेणी – ३५,४०० ते ११२४०० रुपये मासिक पगार
अर्ज कसा करावा?
वरील पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख ६ जून २०२५ आहे.
विचारलेली माहिती व कागदपत्रांसह अर्ज नीट भरावा.