India Post Bharti 2024: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकर अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. विशेष म्हणजे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंडिया पोस्टने बंपर पदासाठी भरती काढली आहे. यामध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी दिली आहे.
विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिस यांच्याकडून राबवली जातेय. थेट पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवारांकडे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही नक्कीच आहे.
भारतीय डाक विभाग भरती २०२४ रिक्त जागा तपशील (India Post Recruitment 2024 vacancy details)
ही भरती प्रक्रिया ७८ पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहे. हेच नाही तर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १६फेब्रुवारी २०२४ आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.
भारतीय डाक विभाग भरती २०२४ वयोमर्यादा (India Post Recruitment 2024 age limit)
जे उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करत आहेत त्या अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते २७ असणे आवश्यक आहे.
हेही वाचा >> NHIDCL Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १३६ पदांसाठी ‘या’ विभागात बंपर भरती
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला १०० रुपयांच्या पोस्टल ऑर्डर आणि इतर कागदपत्रांसह व्यवस्थापक (ग्रेड ए), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर – २०८००१ तेथे पाठवावे लागेल. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १६ फेब्रुवारी २०२४ आहे.