Mail Motor Service Mumbai Bharti 2023: इंडिया पोस्ट विभागाच्या मेल मोटर सेवा मुंबई येथे कुशल कारगीर पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.या भरतीप्रक्रियेंतर्गत एकून १० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे. इच्छूक उमेदवार या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मे २०२३ असणार आहे. मेल मोटर सेवा (Mail Motor Service) पात्र उमेदवार त्यांचे अर्ज http://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे करु शकतात.

मेल मोटर सेवा भरती 2023 साठी वयोमर्यादा

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
BEST employees and passengers protest
बेस्ट कर्मचारी, प्रवाशांचे निषेध आंदोलन
Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट

पात्र उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. वयोमर्यादेत ओबीसी वर्गातील उमेदरवाराला ३ वर्षाची सूट दिली जाणार आहे तर मार्गवर्गीय उमेदवाराला ५ वर्षाची सूट दिली जाणार आहे.


हेही वाचा – NTPC Recruitment 2023: एनटीपीसीमध्ये असिस्टेंट पदासाठी होणार बंपर भरती, कोण करु शकते अर्ज? जाणून घ्या

मेल मोटर सेवा भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता

या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त तांत्रिक संस्थेकडून संबंधित ट्रेडमध्ये प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. संबंधित व्यापारात एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. याशिवाय, मेकॅनिक (मोटार वाहन) पदासाठी अर्जदारांकडे अवजड वाहने चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

मेल मोटर सेवा भरती 2023 साठी वेतनमान

कुशल कारागीर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांला १९,९००/ रुपये (७ व्या CPC नुसार वेतन मॅट्रिक्समधील स्तर २) पगार मिळेल

मेल मोटर सेवा भरती 2023 साठी निवड प्रक्रिया
कुशल कारागिरांची निवड पात्र असलेल्या उमेदवारांमधून केली जाईल
पात्र उमेदवारांना त्यांच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि ठिकाण स्वतंत्रपणे सूचित केले जाईल.
पात्र नसलेल्या इतर अर्जदारांच्या संदर्भात कोणतीही सूचना पाठवली जाणार नाही.

१०वीसह ITIचे प्रमाणपत्र असेल तर BSF मिळू शकते नोकरी, ८१ हजारपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज

मेल मोटर सेवा भरती 2023 साठी अर्ज कसा पाठवावा
पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवू शकतात. या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वर, मुंबई 40001 .

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना प्रथम ऑनलाइन अर्ज करुन नंतर तो फॉर्म डाउनलोड करावा लागेल आणि तो दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. एकापेक्षा जास्त ट्रेडसाठी अर्ज केल्यास, प्रत्येक ट्रेडसाठी स्वतंत्र अर्ज वेगळ्या लिफाफ्यात पाठवावे लागतात.

लिफाफ्यावर पोस्टाच्या नावासह सुपरस्क्राइब केलेले असावे आणि ‘द सीनियर मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए’ ला संबोधित केलेला अर्ज केवळ स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवला जावा. वर दिलेल्या या पत्यावर अर्ज पाठवू शकता

  • उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज फक्त स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टद्वारे पाठवावा.
  • अर्ज शेवटच्या तारखेआधी दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023 आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर मिळालेल्या अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.

अधिकृत अधिसुचनाhttps://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_10042023_MMS_Eng.pdf

अधिकृत वेबसाईट http://www.indiapost.gov.in

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता,

Story img Loader