India post office Recruitment 2025 : भारतातील डाक विभाग म्हणजेच इंडिया पोस्ट (India Post) होय. हा विभाग टपाल सेवा, पार्सल आणि इतर संबंधित सेवा पुरवते. देशभरात या डाक विभागाचे लाखो कार्यालये आहेत. या कार्यालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असते. येथील पदांसाठी अनेक लोक अर्ज करतात.
जर तुम्ही पदवीधर असाल आणि भारतीय डाक विभागात (India Post) नोकरी करायचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. डाक विभागात सध्या एका पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आज आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
भारतीय डाक विभागाने टेक्निकल सुपरवायजर पदासाठी अर्ज मागितले आहे. अशात इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करावे. या पदासाठी उमेदवार १५ एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. पण अर्ज करण्यापूर्वी रिक्त जागेशी संबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण अधिसुचना नीट वाचावी. तसेच या पदासाठी अर्ज करताना वय मर्यादा – उमेदवाराचे वय १ जुलै २०२४ पर्यंत २२ ते ३० इतके असणे आवश्यक आहे.
कोण अर्ज करू शकतात?
या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराची शैक्षणिक पात्रता महत्त्वाची ठरते. उमेदवारचा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इजिनिअरींग मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही ऑटोमोबाइल फर्म किंवा सरकारी ठिकाणी दोन वर्षांचे प्रॅक्टिकल नॉलेज असणे आवश्यक आहे.
नोटिफिकेशनची लिंक
भारतीय डाक विभाग च्या indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा.
अर्ज कसा करावा?
- उमेदवाराने सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जावे.
- त्यानंतर Recruitment टॅबवर क्लिक करावे.
- तुमच्यासमोर या पदाशी संबंधित पीडीएफ फाइल दिसेल.
- अधिसुचनेच्या शेवटी अप्लीकेशन फॉर्म मिळेल. त्याला डाउनलोड करावे आणि प्रिंटआउट काढावी.
- हा अर्ज नीट भरावा आणि आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- तसेच अधिसुचनेत दिलेल्या पत्त्यावर हा अर्ज पाठवावा