भारतीय पोस्ट खात्यामध्ये दोन वर्षांची सेवा दिलेले ‘ग्रामीण डाक सेवक ( GDS)’ यांची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ( IPPB) मध्ये ‘एक्झिक्युटिव्ह’ पदावर भरती. (Advt. No. IPPB/ CO/ HR/ RECT/२०२४-२५/०३)

पदाचे नाव : एक्झिक्युटिव्ह. एकूण रिक्त पदे – ३४४.

राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील – महाराष्ट्र – १९, कर्नाटक – २०, गुजरात – २९, गोवा – १, मध्यप्रदेश – २०, आंध्र प्रदेश – ८, तेनंगणा – १५ इ.

पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.

अनुभव : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) किमान २ वर्षांचा ग्रामीण डाक सेवक पदावरील अनुभव.

वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) २० ते ३५ वर्षे.

वेतन : दरमहा एकत्रित वेतन रु. ३०,०००/-. (कामगिरी पाहून ठराविक रकमेची वार्षिक वेतनवाढ दिली जाईल.)

नेमणुकीचा कालावधी : सुरुवातीला १ वर्षासाठी नेमणूक दिली जाईल. त्यानंतर बँकेच्या व्यवसायाची गरज पाहता दर सहा महिन्यांनी उमेदवाराची कामगिरी पाहून आणखी एकूण २ वर्षांसाठी नेमणूकीचा कालावधी वाढविला जाईल.

हेही वाचा >>> PGCIL Trainee Recruitment 2024: ७९५ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया आणि शेवटची तारीख

निवड पद्धती : पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार GDS उमेदवारांची निवड केली जाईल. गरज भासल्यास IPPB निवडीसाठी ऑनलाइन टेस्ट घेवून शकेल.

पोस्टल सर्कलनिहाय गुणवत्ता यादीमधून उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. उमेदवारांना Divisional Head कडून Vigilance clearance सर्टिफिकेट सादर करावे लागेल.

रजा : IPPB मध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱया GDS ना लागू असलेल्या GDS नियमांनुसार रजा दिली जाईल.

शंकासमाधानासाठी jobsdop@ippbonline.in ई-मेल आयडीवर मेल करा. IPPB च्या देशभरात एकूण ६५० बँकिंग आऊटलेट्स आहेत.

सर्कल/राज्यनिहाय बँकिंग आऊटलेट्समधील एक्झिक्युटिव्हच्या रिक्त असलेल्या ३४४ पदांचा तपशील IPPB च्या www.ippbonline.com या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये Annexure- I मध्ये उपलब्ध आहे.

GDS ने निवडलेल्या सर्कल/राज्यातील दोन बँकिंग आऊटलेट्सचा पसंतीक्रम ऑनलाइन अर्जात नोंदवावयाचा आहे. महाराष्ट्रातील पुढील ठिकाणी प्रत्येकी एक IPPB चे बँकिंग आऊटलेट्समध्ये एक्झिक्युटिव्हची रिक्त पदे आहेत. अहमदनगर, बारामती, पुणे, सातारा, रत्नागिरी, पनवेल, गिरगाव, औरंगाबाद, धुळे, जळगाव, जालना, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि बीडमध्ये २ पदे रिक्त पदे आहेत. गोवा राज्यातील पणजी येथे १ पद.

अर्जाचे शुल्क : रु. ७५०/-.

ऑनलाइन अर्ज www.ippbonline.com या संकेतस्थळावर दि. ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करावेत.