गुणवान खेळाडूंची पोस्ट खात्यामध्ये (Department of Post) ग्रुप-सी च्या एकूण १,८९९ पदांवर भरती. देशभरातील एकूण, महाराष्ट्र आणि काही लगतच्या राज्यांतील रिक्त पदांचा तपशील –
(१) पोस्टल असिस्टंट – एकूण ५९८. महाराष्ट्र – ४४, कर्नाटक – ३२, गुजरात – ३३, मध्य प्रदेश – ५८, छत्तीसगड – ७, तेलंगणा – १६, आंध्र प्रदेश – २७.
(२) सॉर्टिंग असिस्टंट – एकूण १४३. महाराष्ट्र – ३१, कर्नाटक – ७, गुजरात – ८, मध्य प्रदेश – ६, छत्तीसगड – २, तेलंगणा – १६, आंध्र प्रदेश – २.
पद क्र. १ व पद क्र. २ साठी पात्रता : (i) पदवी उत्तीर्ण, (ii) संगणक चालविण्याचे ज्ञान.
वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ४ (२५,५०० – ८१,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ५०,०००/-.
(३) पोस्टमन – एकूण ५८५. महाराष्ट्र – ९०, कर्नाटक – ३३, गुजरात – ५६, मध्य प्रदेश – १६, छत्तीसगड – ५, तेलंगणा – २०, आंध्र प्रदेश – १५.
(४) मेलगार्ड – एकूण ३. तेलंगणा – २.
हेही वाचा >>> १२ वी पास, B.com आणि मेडिकल उमेदवारांना नोकरीची संधी! NHM रायगड अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु
पद क्र. ३ व पद क्र. ४ साठी पात्रता : (i) १२ वी उत्तीर्ण, (ii) संगणक चालविण्याचे ज्ञान, (iii) उमेदवारांना संबंधित पोस्टल सर्कलमधील स्थानिय भाषा अवगत असावी. (नसल्यास त्यांना नेमणुकीनंतर २ वर्षांच्या प्रोबेशन कालावधीत पोस्ट खात्याची स्थानिय भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.) पोस्टमन पदाकरिता उमेदवाराकडे दोन चाकी वाहन किंवा हलके वाहन (LMV) चालविण्याचा परवाना असावा. (नसल्यास नेमणुकीनंतर त्यांना असा परवाना जोवर ते सादर करत नाहीत, त्यांना वार्षिक वेतनवाढ दिली जाणार नाही.) असा परवाना सादर केल्यानंतर त्यांचे वेतन संभाव्य पुनर्संचयित (restored prospectively) केले जाईल.
वेतन श्रेणी : पे-लेव्हल – ३ (२१,७०० – ६९,१००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४०,०००/-.
(५) मल्टि टास्किंग स्टाफ (एमटीएस) – एकूण ५७०. महाराष्ट्र – १३१, कर्नाटक – २२, गुजरात – ८, मध्य प्रदेश – १, तेलंगणा – १६, आंध्र प्रदेश – १७.
पुढील खेळांतील गुणवान खेळाडूंची भरती. (ऑफिशियल वेबसाईटवरील जाहिरातीमधील पॅरा ७ मध्ये दिलेल्या ४२ क्रीडा प्रकारांमधील प्रावीण्य असणे आवश्यक.)
(१) तिरंदाजी (Archery) (२) अॅथलेटिक्स (३) आट्या-पाट्या (४) बॅडमिंटन (५) बॉल बॅडमिंटन (६) बेसबॉल (७) बास्केटबॉल (८) बॉडी बिल्डिंग (९) बॉक्सिंग (१०) चेस (११) क्रिकेट (१२) सायकलिंग (१३) तलवारबाजी (Fencing) (१४) फूटबॉल (१५) हँडबॉल (१६) हॉकी (१७) ज्युडो (१८) कबड्डी (१९) कराटे (२०) खो-खो (२१) पॅरा स्पोर्ट्स (२२) पॉवर लिफ्टिंग (२३) नेमबाजी (Shooting) (२४) शूटिंग बॉल (२५) Rowing (२६) सॉफ्टबॉल (२७) Squash (२८) टेबल टेनिस (२९) कुस्ती (Wrestling) (३०) टेनिस बॉल क्रिकेट (३१) वेटलिफ्टिंग (३२) व्हॉलीबॉल (३३) योगासने इ. एकूण ४२ खेळांचे प्रकार.
पात्रता : १० वी उत्तीर्ण.
वेतन श्रेणी : पे-लेव्हल – १ (१८,००० – ५६,९००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३३,०००/-.
वयोमर्यादा : (सर्व कॅटेगरीस/ सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादेत असलेली ५ वर्षांची सूट यासह) पद क्र. १ ते ४ साठी १८-३२ वर्षे. पद क्र. ५ एमटीएससाठी १८-३० वर्षे.
कमाल वयोमर्यादेत सूट : अजा/ अज – ५ वर्षे.
(१) आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांना प्रथम पसंती दिली जाईल.
(२) सिनिअर लेव्हल/ ज्युनियर लेव्हल नॅशनल चँपियनशिप स्पर्धांत राज्याचे प्रतिनिधित्व करून पदक मिळविणारे किंवा १ ते ३ स्थान मिळविणारे उमेदवारांना दुसरे प्राधान्य देण्यात येईल.
(३) इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशनमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून मेडल मिळविणारे किंवा १ ते ३ स्थान मिळविणारे उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य देण्यात येईल.
(४) नॅशनल स्कूल गेम्समध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करताना पदक किंवा १ ते ३ स्थान मिळविणारे उमेदवारांना ४ थ्या क्रमांकाचे प्राधान्य देण्यात येईल.
(५) फिजिकल इफिशियन्सीमध्ये राष्ट्रीय पारितोषिक मिळविणाऱ्या उमेदवारांना ५ व्या क्रमांकाचे प्राधान्य देण्यात येईल.
(६) राज्य/ विद्यापीठ/ राज्याची शालेय टीम यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांना वरील २ ते ४ मध्ये नमूद केलेल्या स्पर्धांमध्ये मेडल मिळाले नाही किंवा १ ते ३ स्थान मिळाले नाही, त्यांना ६ व्या क्रमांकाचे प्राधान्य देण्यात येईल.
कोणत्या क्रीडा प्रकारासाठी उमेदवाराने कोणत्या नमुन्यातील दाखला आणि तो कोणत्या अधिकाऱ्याने जारी केलेला असावा याची यादी जाहिरातीमधील पॅरा ८ मध्ये दिलेली आहे.
निवड पद्धती : वर दिलेल्या प्राधान्य क्रमाने उमेदवारांनी पदांसाठी (Cadre) आणि पोस्टल सर्कलसाठी दिलेल्या पसंतीक्रमानुसार तात्पुरती गुणवत्ता यादी बनविली जाईल.
प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमधील उमेदवारांना जाहिरातीच्या पॅरा १५ मध्ये दिलेली मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील. पोस्टल सर्कल ऑफिसमध्ये कागदपत्र पडताळणी घेतली जाईल. सोबत मूळ कागदपत्रांच्या तीन सत्यप्रती सादर करणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवारांना पोस्ट खात्याने नेमून दिलेले प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.
अर्जाचे शुल्क : रु. १००/-. ऑनलाइन पद्धतीने (UPI, नेट बँकिंग, क्रेडिट/ डेबिट कार्ड) भरावे. (अजा/ अज/ दिव्यांग/ ईडब्ल्यूएस / महिला उमेदवारांना फी माफ आहे.) ऑनलाइन अर्जात काही बदल करावयाचा असल्यास दि. १० ते १४ डिसेंबर २०२३ दरम्यान window for Application Form Correction उपलब्ध असेल. ऑनलाइन अर्ज https://dopsportsrecruitment.cept.gov.in या संकेतस्थळावर दि. ९ डिसेंबर २०२३ पर्यंत करावेत. (आपला कॅडर (पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, एम्टीएस्) आणि पोस्टल सर्कल-साठीचा पसंतीक्रम देणे आवश्यक आहे.)