India Post Staff Car Driver Recruitment 2023 Notification: जर तुम्ही १०वी पास असाल आणि तुम्ही सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय डाक विभागामध्ये काम करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी मिळणार आहे. भारतीय डाक विभागाने 58 कर्मचारी कार चालक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. पोस्टल सर्कल अंतर्गत वेगवेगळ्या झोनमध्ये ही पदे उपलब्ध आहेत.
इच्छूक आणि पात्र उमेदवार ३१ मार्च २०२३ पर्यंत किंवा त्याआधी या पदासाठी अर्ज पाठवू शकतात. नोटीफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या इतर पात्रेतसह १०वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वाहन चालविण्याबाबत ज्ञात असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.
भारतीय डाक कर्मचारी कार चालक भरती २०२३ नोटिफिकेशनसाठी सर्व आवश्यक माहिती खाली दिली आहे. ज्यामध्ये पात्रता/ वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा आणि इतर माहिती समाविष्ट आहे.
अधिसूचना तपशील :
क्रमांक MSE/89-2/XV/2021
महत्वाची तारीख :
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ३१ मार्च २०२३
रिक्त पदे:
एकूण पदे – ५८
वयोमर्यादा:
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ते २७ वर्षे दरम्यान असावे.
पगार:
या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना १९९०० रुपये ते ६३२०० रुपये पगार दिला जाईल.
फूड कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी होतेय बंपर भरती; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता आणि निकष
शैक्षणिक पात्रता:
- हलक्या आणि जड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक
- मोटर यंत्रणेचे ज्ञान (उमेदवारांना वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यात सक्षम असावे)
- हलकी आणि जड वाहने चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव.
- मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10वी उत्तीर्ण.
- तुम्हाला शैक्षणिक पात्रता/पात्रता/वयोमर्यादा/अर्ज प्रक्रिया आणि इतर पदांसाठीच्या तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना पाहा.
भारतीय डाक कर्मचारी कार चालक भरती २०२३साठी अधिसूचना कशी डाउनलोड करावी
- उमेदवारांनी सर्व प्रथम इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दया.
- होमपेजवरील अनाउंससमेंट सेक्शनमध्ये जावे
- होमपेजवर उपलब्ध असलेल्यया Recruitment of 58 posts of Staff Car Driver (ordinary grade) under direct recruitment in Tamilnadu Circle PDF Icon [2384 KB]‘ या नोटिफिकेशनवर क्लिक करा.
- आता तुम्हाला एक विंडोमध्ये इंडिया पोस्ट स्टाफ कार डायव्हर भरती २०२३ नोटीफिकेशनचे पीडीएफ मिळेल.
- भारतीय डाक कर्मचारी कार चालक भरती २०२३अधिसूचना डाउनलोड करा आणि आपल्या भविष्यातील संदर्भासाठी जतन करा. ही भरती तामिळनाडू सर्कलमध्ये करायची आहे हे लक्षात ठेवा.