सुहास पाटील

इंडियन आर्मीमध्ये अविवाहीत पुरुष/ महिला उमेदवारांकरिता एप्रिल, २०२५ पासून प्री-कमिशनिंग ट्रेनिंग अॅकॅडमी (PCTA), ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (OTA), चेन्नई येथे सुरू होणाऱ्या SSC (Tech) ट्रेनिंग कोर्ससाठी प्रवेश. एकूण ३८१ पदे. (एसएससी (टेक) पुरुष – ६४ वा कोर्स – ३५० पदे, एसएससी (टेक) महिला – ३५ वा कोर्स – २९ पदे, संरक्षण दलातील सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा – २ पदे) रिक्त पदांचा तपशील इंजिनीअरिंग स्ट्रीमनुसार पुढीलप्रमाणे –

Job Opportunity Opportunities in Bureau of Indian Standards career news
नोकरीची संधी: ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्समधील संधी
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Job Opportunity Opportunities in BPCL career
नोकरीची संधी: ‘बीपीसीएल’मधील संधी
ISRO Recruitment 2024:
ISRO Recruitment 2024: इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! १०० मेडिकल ऑफिसर आणि असिस्टंट पदांसाठी होणार भरती, लवकर करा अर्ज
joint admission test for masters career marathi news
शिक्षणाची संधी: जॉईंट ॲडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स
Warivo CRX Electric Scooter Price Feature
Warivo CRX Electric Scooter: गुरुग्राम कंपनी Warivo ने लाँच केली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर CRX; पाहा किंमत आणि फीचर्स
job opportunities in irdai
नोकरीची संधी : ‘आयआरडीएआय’मधील संधी
Ajay Walimbe article Portfolio Market Structure Mutual Funds print eco news
शेअर बाजार, माझा पोर्टफोलियो: बाजार संरचनेतील अत्यावश्यक ‘कोठार’- सीडीएसएल!

(१) सिव्हील इंजिनीअरिंग/ बिल्डींग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी/ आर्किटेक्चर : पुरुष – ७५ पदे, महिला – ७ पदे.

(२) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/ M. Sc. कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी : पुरुष – ६० पदे, महिला – ४ पदे.

(३) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रूमेंटेशन/ इन्स्ट्रूमेंटेशन : पुरुष – ३३ पदे, महिला – ३ पदे.

(४) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/ फायबर ऑप्टिक्स/ टेली कम्युनिकेशन/ मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रोवेव्ह/ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स/ सॅटेलाईट कम्युनिकेशन : पुरुष – ६४ पदे, महिला – ६ पदे.

(५) मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/ इंडस्ट्रियल/ इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग/ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट/ वर्कशॉप टेक्नॉलॉजी/ एअरोनॉटिकल/ एअरोस्पेस/ एव्हिऑनिक्स : पुरुष – १०१ पदे, महिला – ९ पदे.

(६) Misc. इंजिनीअरिंग – प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी/ रिमोट सेन्सिंग/ बॅलिस्टिक्स/ फूड टेक्नॉलॉजी/ अॅग्रिकल्चर/ मेटॅलर्जिकल/ बायोटेक/ टेक्स्टाईल इंजिनीअरिंग इ. : पुरुष – १७ पदे.

हेही वाचा >>> ESIC Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ५६ हजार रुपये पगार अन् १५ पदांसाठी भरती

पात्रता : SSC(Tech) मेन/वुमन पदांसाठी : संबंधित विषयातील इंजिनीअरिंग किंवा समतूल्य पदवी उत्तीर्ण.

(अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार जे अंतिम परीक्षा १ एप्रिल, २०२५ पर्यंत उत्तीर्ण करू शकतील, अर्ज करण्यास पात्र आहेत.)

संरक्षण दलातील सेवेत असताना कामी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी – (i) SSC (W) (Non Tech) (Non UPSC) – १ पद. पात्रता – पदवी (कोणतीही शाखा), (ii) SSC (W) (Tech) – १ पद. पात्रता : बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा).

वयोमर्यादा : (दि. १ एप्रिल २०२५ रोजी) २०२७ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. २ एप्रिल १९९८ ते १ एप्रिल २०२५ दरम्यानचा असावा.) संरक्षण दलातील सेवेत कामी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा – ३५ वर्षेपर्यंत.

निवड पद्धती : पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षापर्यंतच्या गुणवत्तेनुसार किंवा अंतिम वर्षात शिकणाऱ्या उमेदवारांच्या ६ व्या सेमिस्टरपर्यंतच्या गुणवत्तेनुसार शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर, वाटप केलेल्या सिलेक्शन सेंटरचे नाव कळविले जाईल. त्यानंतर उमेदवारांनी वेबसाईटवर लॉगइन करून एसएसबीची तारीख निश्चित करावी. (फर्स्ट कम फर्स्ट बेसिस) अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर, कापूरथळा या सिलेक्शन सेंटरवर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची सायकॉलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर आणि इंटरव्ह्यूइंग ऑफिसर यांचेकडून एसएसबी इंटरव्ह्यू घेतला जाईल. (एसएसबी इंटरव्ह्यू ५ दिवसांपर्यंत चालेल.)एसएसबीने निवडलेल्या उमेदवारांची मेडिकल टेस्ट घेतली जाईल. यात फिट ठरणाऱ्या उमेदवारांची गुणवत्तेनुसार ट्रेनिंगसाठी निवड यादी जाहीर केली जाईल.

ट्रेनिंग : निवडलेल्या उमेदवारांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन ‘लेफ्टनंट’ पदावर नेमले जाईल व त्यांना प्रोबेशनवर ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी, चेन्नई येथे ४९ आठवड्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यास उमेदवारांना मद्रास युनिव्हर्सिटीकडून ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रटेजिक स्टडिज’ दिला जाईल. लेफ्टनंट पदावर २ वर्ष सेवा पूर्ण केल्यावर कॅप्टन पदावर बढती दिली जाईल. ६ वर्षं पूर्ण केल्यावर ‘मेजर’ पदावर बढती मिळेल. १३ वर्षे पूर्ण केल्यावर लेफ्नंट कर्नल पदावर बढती मिळेल.

ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना रु. ५६,१००/- स्टायपेंड दिले जाईल. लागू असलेले इतर भत्ते ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिले जातील. ट्रेनिंगनंतर मिळणारे वेतन अंदाजे १.२५ लाख रुपये असेल. ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना विवाह करता येणार नाही. जंटलमन/ लेडी कॅडेट्सचा रु. १ कोटीचा विमा उतरविला जाईल.

१० वर्षांच्या सर्व्हिसनंतर ज्या उमेदवारांना पर्मनंट कमिशन मिळवायचे असेल त्यांना पात्र असल्यास पर्मनंट कमिशनसाठी विचार केला जाईल. ज्यांना पर्मनंट कमिशन मिळणार नाही असे उमेदवार सर्व्हिस कालावधी वाढून मिळण्यासाठी मागणी करू शकतात. त्यानुसार सर्व्हिस २ अधिक २ वर्षांसाठी वाढविली जाऊ शकते.

शंकासमाधानासाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या Feedback/ Query या ऑप्शनवर संपर्क साधावा. ऑनलाइन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी ३ दिवस अगोदर केलेल्या शंकाचेच निरसन केले जाईल. ऑनलाइन अर्ज http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. १४ ऑगस्ट २०२४ (१५.०० वाजे) पर्यंत करावेत. (Officer Entry Appln/ Login? Registration? Officer’s Selection Eligibility? Apply)