Indian Army TES 52 Recruitment 2024 : अनेकांचे भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न असते. काही जणांचे हे स्वप्न पूर्ण होते तर काही जणांना अर्ध्यातच माघार घ्यावी लागते. जर तुम्हालादेखील भारतीय सैन्यात भरती व्हायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय सैन्याने ५२ व्या (TES 52) अभ्यासक्रमासाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया आज १३ मे पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ जून अशी असणार आहे. भरती संबंधित शैक्षणिक पात्रता, महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज करण्यासाठीचे टप्पे, याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
रिक्त पद – टेक्निकल एंट्री स्कीम या पदासाठी ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह १२ वीच्या परीक्षेत ६० टक्के गुण आणि जेईई २०२४ च्या मुख्य परीक्षेलाही बसलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा – भारतीय सैन्य TES 52 साठी पात्र होण्यासाठी उमेदवारांचे वय १६ ते १९ वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा ?
इच्छुक उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवर “ऑनलाइन ॲप्लिकेशन” टॅब शोधा.
तेथे दिलेली सूचना पूर्णपणे वाचा आणि अर्ज भरा.
तुमची माहिती तेथे व्यवस्थित भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. जसे की, तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि आयडी प्रूफ. सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या.
अर्ज सबमिट करा आणि अर्ज फी असल्यास तीसुद्धा भरून घ्या.
सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रिंटआऊटसुद्धा घ्या.
अधिक माहितीसाठी अधिसूचना एकदा तपासून घ्यावी.
लिंक – https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/NOTIFICATION-Tes-52.PDF
उमेदवारांनी एकच अर्ज सादर करायचा आहे. एकाच उमेदवाराकडून अनेक अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल, ही बाब लक्षात ठेवावी.