Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्यात (Indian Army) ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी भारतीय सैन्यदलाने एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या NCC स्पेशल एंट्री कोर्ससाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पात्र उमेदवार जे या पदांवर नोकरीसाठी अर्ज करू इच्छितात, ते भारतीय सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळला भेट देऊन joinindianarmy.nic.in च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता.
या भरती अभियानांतर्गत एकूण ५५ पदांवर भरती होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ५ जुलैपासून सुरू झालेली आहे. आणि ३ ऑगस्ट २०२३ ला संपणार आहे. जे उमेदवार या पदावर नोकरी करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल पात्रता, निवड प्रक्रिया, आणि इतर तपशील लक्ष देऊन वाचावे.
भारतीय सैन्यात भरती केल्या जाणाऱ्या पदांची संख्या
NCC पुरुष: ५० पद
NCC महिला: ५ पद
iहेही वाचा – NLC Recruitment 2023 : एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरसह ‘या’ पदांसाठी निघाली भरती, ५० हजार ते २ लाखांपर्यंत मिळू शकतो पगार
भारतीय सैन्यात भरतीसाठी काय आहे शैक्षणिक पात्रता
NCC ‘सी सर्टिफिकेट धारकांसाठी: उमेदवारांना किमान ५०% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून ग्रेजुएटची पदवी असणे आवश्यक आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले उमेदवार देखील अर्ज करु शकतात, अर्थात त्यांनी तीन/चार डिग्री कोर्सेस प्रथम दोन/तीन वर्षांमध्ये क्रमशः अनुभव ५०% एकूण गुण मिळवले असावेत.
भारतीय सैन्य कर्मचार्यांच्या युद्ध अपघात वॉर्डसाठी: उमेदवारांने किमान 50% गुणांसह मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून ग्रेजुएट असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची वयोमर्यादा काय आहे?
उमेदवाराची वयोमर्यादा १ जानेवारी २०२३ला १९ ते २५ दरम्यान असली पाहिजे. ( जन्म २ जानेवारी १९९९ च्या आधी आणि १ जानेवारी २००५ नंतरचा नसावा)
येथे पाहा अर्जाची लिंक आणि अधिसुचना
भारतीय सैन्यात भरती अर्जाची थेट लिंक – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
भारतीय सैन्यात भरती अधिसुचना –https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/NOFTN_FOR_NCC_SPL_ENTRY_55_COURSE.pdf
हेही वाचा – यूपीएससी CSE शिवाय मंत्रालयात जॉइंट सेक्रेटरी होण्याची संधी, आजच करा अर्ज
निवड प्रक्रिया
रक्षा मंत्रालयाचे (सेना) अधिकृत मुख्यालय विनाकारण शिवाय अर्ज शॉर्टलिस्ट करण्याचा अधिकार सुरक्षित आहे. निवडकेंद्र, अलाहाबाद (उत्तर प्रदेश), भोपाळ (मध्य प्रदेश), बेंगळुरू (कर्नाटक) आणि जालंधर (पंजाब) येथे केवळ निवडलेल्या पात्र उमेदवारांनाच SSB साठी जावे लागेल. उमेदवारांना दोन टप्प्यातील निवड प्रक्रियेतून जावे लागेल. जे पहिला टप्पा पास करतात ते दुसऱ्या टप्यात जातील. जे पहिल्या टप्यात अपयशी ठरतील त्यांना त्याच दिवशी परत जावे लागेल. SSB मुलाखतीत उमेदवाराने मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.