सुहास पाटील

१२ वी उत्तीर्ण पुरुष/ महिला अविवाहीत उमेदवारांना डिफेन्समध्ये लेफ्टनंट पदावर भरती होण्याची संधी. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) २ जानेवारी २०२५ पासून सुरू होणाऱ्या एनडीएच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्जमधील १५३ वा कोर्स आणि ११५ वा इंडियन नेव्हल ॲकॅडमी कोर्स (INAC) साठी दि. २१ एप्रिल २०२४ रोजी ‘नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी ॲण्ड नेव्हल ॲकॅडमी एक्झामिनेशन ( I) २०२४’ ही प्रवेश परीक्षा घेणार आहे.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ

प्रवेश क्षमता : ४०० पदे. नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी ३७० जागा. (आर्मी – २०८ (महिलांसाठी – १० जागा), नेव्ही – ४२ (महिलांसाठी – १२ जागा) आणि एअरफोर्स – १०० (फ्लाईंग ब्रँचसाठी – ९२ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल) ब्रँच – १८ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – १० जागा (यातील २ जागा महिलांसाठी)). नेव्हल ॲकॅडमी (१० अधिक २ कॅडेट एन्ट्री स्कीम) – ३० जागा (९ जागा महिला उमेदवारांसाठी).

हेही वाचा >>> VIDEO : यूपीएससी-एमपीएससी २०२५ परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

परीक्षा केंद्र : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद, पणजी इ.

पात्रता : (i) एनडीए आर्मी विंगसाठी – १२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा), (ii) एन्डीएमधील एअरफोर्स आणि नेव्हल विंग्ज आणि इंडियन नेव्हल ॲकॅडमीमधील १० अधिक २ कॅडेट एन्ट्रीसाठी – १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांसह) उत्तीर्ण.

१२ वीच्या परीक्षेला बसणारे उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना २४ जून २०२४ पर्यंत १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म दि. २ जुलै २००५ ते १ जुलै २००८ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड : उंची (पुरुष) – एअरफोर्स फ्लाईंग ब्रँचसाठी १६२.५ सें.मी., (पुरुष/ महिला) ग्राऊंड ड्युटी ब्रँचसाठी – १५७.५ सें.मी.; (१८ वर्षांखालील मुला/ मुलींना २ सें.मी. ची सूट मिळू शकते.) उंची – महिला – १५२ सें.मी.; आर्मीतील फ्लाईंग ब्रँचसाठी किमान उंची १६३ सें.मी.; वजन – वय आणि उंचीच्या प्रमाणात. नेव्हीसाठी पुरुष – उंची – १५७ सें.मी., महिला – उंची – १५२ सें.मी.

दृष्टी : नेव्हीमधील एन्ट्रीसाठी चष्म्याशिवाय ६/६, ६/९; चष्म्यासह – ६/६, ६/६. आर्मी एन्ट्रीसाठी दृष्टी चष्म्याशिवाय ६/३६, ६/३६. एअरफोर्स विंगसाठी दृष्टी – ग्राऊंड ड्युटी ब्रँचेससाठी चष्म्याशिवाय ६/३६, ६/३६; चष्म्यासह ६/६, ६/६; फ्लाईंग ब्रँचसाठी चष्म्याशिवाय ६/६, ६/९, चष्म्यासह ६/६, ६/६.

इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तंदुरुस्तीकरिता पुढील सराव ठेवावा. (ए) २.४ कि.मी. अंतर १५ मिनिटांत धावणे, (बी) स्किपिंग, (सी) पुशअप्स आणि सिटअप्स (किमान २० प्रत्येकी), (डी) चिनअप्स किमान ६, (इ) रोप क्लाइंबिंग – ३ ते ४ मीटर.

हेही वाचा >>> म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना असते परदेशी शिक्षणाची ओढ…

परीक्षा पद्धती : ओएमआर शिटवर उत्तरे फक्त काळ्या बॉल पॉईंट पेननेच मार्क करावयाची आहेत. (ए) लेखी परीक्षा – एकूण ९०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची. पेपर – (१) मॅथेमॅटिक्स कालावधी २ १/२ तास, गुण ३००, पेपर – (२) जनरल ॲबिलिटी टेस्ट कालावधी २ १/२ तास, गुण ६००. पार्ट-ए – इंग्लिश – २०० गुण, पार्ट-बी – जनरल नॉलेज – ४०० गुण. (सेक्शन-ए – फिजिक्स – १०० गुण, सेक्शन-बी – केमिस्ट्री – ६० गुण, सेक्शन-सी – जनरल सायन्स – ४० गुण, सेक्शन-डी – इतिहास, फ्रिडम मुव्हमेंट (सोशल स्टडीज) – ८० गुण, सेक्शन-ई – जीओग्राफी – ८० गुण आणि सेक्शन-एफ – करंट इव्हेंट्स – ४० गुण). प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एसएसबी सिलेक्शन सेंटर निवडीसाठी आणि मुलाखतीची तारीख निवडण्यासाठी उमेदवारांनी आर्मीसाठी www.joinindianarmy.nic.in नेव्हीसाठी www.joinindiannavy.gov.in एअरफोर्ससाठी www.careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर लॉगइन करा.

(बी) एसएसबी इंटरव्ह्यू – जुलै २०२४ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान घेतले जातील. ( i) स्टेज-१ – ऑफिसर इंटेलिजन्स रेटींग ( डकफ) आणि पिक्चर परसेप्शन ॲण्ड डिस्क्रीप्शन टेस्ट ( PP & DT). ( ii) स्टेज-२ – इंटरव्ह्यू, ग्रुप टेस्टींग ऑफिसर टास्क्स, सायकॉलॉजी टेस्ट आणि कॉन्फरन्स या टेस्ट ४ दिवस चालतील. एसएसबी इंटरह्यू एकूण – ९०० गुण. टेस्ट्सविषयी विस्तृत माहिती भन oinindianarmy.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अर्जाचे शुल्क : रु. १००/- (अजा/ अज/ महिला/ (JCOs/ NCOs/ ORs यांचे पाल्य यांना फी माफ)). SBI चलान डाऊनलोड करण्याचा अंतिम दिनांक ८ जानेवारी २०२४ (२३.५९ वाजेपर्यंत) चलान दुसऱ्या दिवशी भरता येईल. ऑनलाइन/ इंटरनेट मोडने फी दि. ९ जानेवारी २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत भरता येईल.

ट्रेनिंग : NDA च्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी निवडलेल्या उमेदवारांना ३ वर्षांचे प्रिलिमिनरी ट्रेनिंग एनडीए, पुणे येथे दिले जाईल आणि इंडियन नेव्हल ॲकॅडमीसाठी निवडलेल्या उमेदवारांना इझिमाला, केरळ येथे ४ वर्षांच्या ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या (अ) आर्मी कॅडेट्सना बी.एस्सी./ बी.एस्सी. (कॉम्प्युटर)/ बी.ए.; (ब) नेव्हल कॅडेट्सना बी.टेक. (डिग्री); (क) एअरफोर्स कॅडेट्सना बी.टेक./ बी.एस्सी./ बी.एस्सी. (कॉम्प्युटर) डिग्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिल्या जातील.

एनडीएमधून उत्तीर्ण – आर्मी कॅडेट्सना – इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (आयएमए), डेहराडून येथे (१ वर्षाचे ट्रेनिंग); नेव्हल कॅडेट्सना इंडियन नेव्हल ॲकॅडमी, इझिमाला येथे (१ वर्षाचे ट्रेनिंग) आणि फ्लाईंग ब्रँच एअरफोर्स कॅडेट्सना एअरफोर्स अकॅडमी हैदराबाद येथे (१ १/२ वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल.) एअरफोर्स ग्राऊंड ड्युटी ब्रँच कॅडेट्सना १ वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या जेंटलमेन कॅडेट्सना आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर, नेव्हल कॅडेट्सना सबलेफ्टनंट पदावर आणि एअरफोर्स कॅडेट्सना (१ वर्षानंतर) फ्लाईंग ऑफिसर पदावर तैनात केले जाईल. ट्रेनिंग दरम्यान जेंटलमन/ महिला कॅडेट्सना रु. ५६,१००/- स्टायपेंड (दरमहा) दिले जाईल. त्यांचे ट्रेनिंग दरम्यान देय असलेल्या भत्त्यांची थकबाकी ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिली जाईल.

शंकासमाधानासाठी UPSC च्या सुविधा केंद्राचा टेलिफोन नं. ०११-२३३८५२७१/ २३३८११२५/ २३०९८५४३ विस्तार क्र. ४११९, ४१२० वर कामाच्या दिवशी सकाळी १०.०० ते १७.०० वाजेपर्यंत संपर्क साधावा.

ई-ॲडमिट कार्ड UPSC च्या वेबसाईटवर (upsc.gov.in) परीक्षा सुरू होण्याच्या तारखेच्या ३ आठवडे आधी उपलब्ध करून दिले जातील. उमेदवारांना जर ई-ॲडमिट कार्ड परीक्षेपूर्वी एक आठवडा अगोदर मिळाले नाही तर त्यांनी ताबडतोब वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. One time registration (OTR) प्रोफाईलमध्ये आयुष्यात फक्त एकदाच बदल करता येईल. (१६ जानेवारी २०२४ पर्यंत)

ऑनलाइन अर्ज १० जानेवारी २०२४ ते १६ जानेवारी २०२४ पर्यंत काही बदल/ सुधारणा करावयाची असेल तर करता येईल. ऑनलाइन अर्ज
http://upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ९ जानेवारी २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.

Story img Loader