सुहास पाटील

१२ वी उत्तीर्ण पुरुष/महिला अविवाहित उमेदवारांना डिफेन्समध्ये लेफ्टनंट पदावर भरती होण्याची संधी. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ( UPSC) २ जुलै २०२५ पासून सुरू होणाऱ्या एनडीएच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्जमधील १५४ वा कोर्स आणि ११६ वा इंडियन नेव्हल ॲकॅडमी कोर्स (INAC) साठी दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी ‘नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी अँड नेव्हल ॲकॅडमी एक्झामिनेशन ( II) २०२४’ ही प्रवेश परीक्षा घेणार आहे. प्रवेश क्षमता – ४०४ पदे. नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी ३७० जागा. (आर्मी – २०८ (महिलांसाठी – १० जागा), नेव्ही – ४२ (महिलांसाठी – ६ जागा) आणि एअरफोर्स – १२० (फ्लाईंग ब्रँचसाठी – ९२ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल) ब्रँच – १८ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – १० जागा (यातील २ जागा महिलांसाठी)). नेव्हल ॲकॅडमी (१० २ कॅडेट एन्ट्री स्कीम) – ३४ जागा (५ जागा महिला उमेदवारांसाठी).

Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Badlapur Sexual Assault Case Update
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे यांना जामीन, दुसऱ्या प्रकरणात मात्र अटक
union minister kiren rijiju interacted with students at the yuva connect program held at modern college
खेळापासून शिक्षणापर्यंत सर्वत्र राजकारणच… केंद्रीय मंत्र्याचे पुण्यात वक्तव्य…
Task Fraud, Retired intelligence officer, Mumbai,
मुंबई : सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे टास्कच्या नादात खाते रिकामे, तीन दिवसांत गमावले ११ लाख
Protest broke out at the Bengaluru college after the recording incident came to light
कॉलेजच्या बाथरूममध्ये महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, रंगेहाथ पकडल्यावर म्हणाला…
Odisha army officers fiance sexual assault news
लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जण निलंबित
School girl molested by senior citizen by threatening to kill her
pune crime: शाळकरी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ज्येष्ठाकडून अत्याचार

परीक्षा केंद्र – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद, पणजी इ.

पात्रता – ( i) एनडीए आर्मी विंगसाठी – १२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा), (ii) एनडीएमधील एअरफोर्स आणि नेव्हल विंग्ज व इंडियन नेव्हल ॲकॅडमीमधील १० २ कॅडेट एन्ट्रीसाठी – १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांसह) उत्तीर्ण. १२ वीच्या परीक्षेला बसणारे उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना २४ जून २०२५ पर्यंत १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी २००६ ते १ जानेवारी २००९ दरम्यानचा असावा.

हेही वाचा >>> MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची संधी! पाहा माहिती

शारीरिक मापदंड – उंची (पुरुष) एअरफोर्स फ्लाईंग ब्रँचसाठी १६२.५ सें.मी., (पुरुष/महिला) ग्राऊंड ड्युटी ब्रँचसाठी – १५७.५ सें.मी.; (१८ वर्षांखालील मुला/मुलींना २ सें.मी. ची सूट मिळू शकते.) उंची – महिला – १५२ सें.मी.; आर्मीतील फ्लाईंग ब्रँचसाठी किमान उंची १६३ सें.मी.; वजन – वय आणि उंचीच्या प्रमाणात. नेव्हीसाठी पुरुष – उंची – १५७ सें.मी., महिला – उंची – १५२ सें.मी.

परीक्षा पद्धती – ओएमआर शिटवर उत्तरे फक्त काळ्या बॉल पॉईंट पेननेच मार्क करावयाची आहेत. प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एसएसबी सिलेक्शन सेंटर निवडीसाठी आणि मुलाखतीची तारीख निवडण्यासाठी उमेदवारांनी आर्मीसाठी www.joinindianarmy.nic.in नेव्हीसाठी www.joinindiannavy.gov.in एअरफोर्ससाठी प्रथम पसंती असलेल्या उमेदवारांनी AFSB साठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर लॉगइन करा. (बी) एसएसबी इंटरह्यू – जानेवारी २०२५ ते एप्रिल २०२५ दरम्यान घेतले जातील. ( i) स्टेज-१ – ऑफिसर सायकॉलॉजिकल ॲप्टिट्यूड टेस्ट आणि इंटेलिजन्स टेस्ट, इंटेलिजन्स रेटींग ( OIR) आणि पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रीप्शन टेस्ट ( PP & DT). ( ii) स्टेज-२ – इंटरह्यू, ग्रुप टेस्टींग ऑफिसर टास्क्स, सायकॉलॉजी टेस्ट आणि कॉन्फरन्स या टेस्ट ४ दिवस चालतील. एस्एस्बी इंटरह्यू एकूण – ९०० गुण. टेस्ट्सविषयी विस्तृत माहिती joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अर्जाचे शुल्क – रु. १००/- (अजा/अज/महिला/(JCOs/ NCOs/ORs यांचे पाल्य यांना फी माफ)). SBI चलान डाऊनलोड करण्याचा अंतिम दिनांक ३ जून २०२४ (२३.५९ वाजेपर्यंत) चलान दुसऱ्या दिवशी भरता येईल. ऑनलाइन/इंटरनेट मोडने फी दि. ४ जून २०२४ (१८.०० वाजे) पर्यंत भरता येईल.

ट्रेनिंग – NDA च्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी निवडलेल्या उमेदवारांना ३ वर्षांचे प्रिलिमिनरी ट्रेनिंग एनडीए, पुणे येथे दिले जाईल आणि इंडियन नेव्हल ॲकॅडमीसाठी निवडलेल्या उमेदवारांना इझिमाला, केरळ येथे ४ वर्षांच्या ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या (अ) आर्मी कॅडेट्सना बी.एस्सी./बी.एस्सी. (कॉम्प्युटर)/बी.ए.; (ब) नेव्हल कॅडेट्सना बी.टेक्. (डिग्री); (क) एअरफोर्स कॅडेट्सना बी.टेक./ बी.एस्सी./ बी.एस्सी. (कॉम्प्युटर) डिग्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिल्या जातील.

एनडीएमधून उत्तीर्ण – आर्मी कॅडेट्सना – इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (आयएमए), डेहराडून येथे (१ वर्षाचे ट्रेनिंग); नेव्हल कॅडेट्सना इंडियन नेव्हल ॲकॅडमी, इझिमाला येथे (१ वर्षाचे ट्रेनिंग) आणि फ्लाईंग ब्रँच एअरफोर्स कॅडेट्सना एअरफोर्स अकॅडमी हैदराबाद येथे एअरफोर्स ग्राऊंड ड्युटी ब्रँच कॅडेट्सना १ वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या जेंटलमेन कॅडेट्सना आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर, नेव्हल कॅडेट्सना सबलेफ्टनंट पदावर आणि एअरफोर्स कॅडेट्सना (१ वर्षानंतर) फ्लाईंग ऑफिसर पदावर तैनात केले जाईल. ट्रेनिंग दरम्यान जेंटलमन/महिला कॅडेट्सना रु. ५६,१००/- स्टायपेंड (दरमहा) दिले जाईल. त्यांचे ट्रेनिंग दरम्यान देय असलेल्या भत्त्यांची थकबाकी ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिली जाईल.

शंकासमाधानासाठी UPSC च्या सुविधा केंद्राचा टेलिफोन नं. ०११-२३३८५२७१/ २३३८११२५/ २३०९८५४३ विस्तार क्र. ४११९, ४१२० वर कामाच्या दिवशी सकाळी १०.०० ते १७.०० वाजेपर्यंत संपर्क साधावा. ई-ॲडमिट कार्ड UPSC च्या वेबसाईटवर (upsc.gov.in) परीक्षा सुरू होण्याच्या तारखेच्या अगोदरच्या आठवड्यात शेवटच्या दिवशी उपलब्ध करून दिले जातील. उमेदवारांना जर ई-ॲडमिट कार्ड वेळेवर मिळाले नाही तर त्यांनी ताबडतोब वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी वन टाईम रजिस्ट्रेशन ( OTR) करणे आवश्यक. OTR प्रोफाईलमध्ये एकदाच बदल करता येईल.

ऑनलाइन अर्ज http://upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. ४ जून २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.