Indian Army SSC Tech Recruitment 2024 : भारतीय सैन्यादलाने ६३ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC)द्वारे टेक पुरुष आणि ३४ व्या SSC टेक महिला अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे भरतीसाठी स्वतःची नोंदणी करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया २३ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत खुली असेल. या भरती मोहिमेद्वारे एकूण ३८१ रिक्त जागा भरण्याचे भारतीय लष्कराचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३५० पदे SSC (Tech) पुरुषांसाठी, २९ SSC (Tech) महिलांसाठी आणि २ पदे संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Indian Army SSC Tech Recruitment 2024 : वयोमर्यादा

इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष, महिला उमेदवारांचे वय ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी २० ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. भारतीय सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी,१ ऑक्टोबर २०२४ रोजी कमाल वय ३५ वर्षे आहे.

हेही वाचा – NCERT मध्ये १७० असिस्टंट एडिटर, प्रूफ रीडर आणि DTP ऑपरेटर्सची होणार भरती; ८० हजारांपर्यंत मिळू शकतो पगार

Indian Army SSC Tech Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार जे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण आहेत किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहेत ते अर्ज करण्यास पात्र असतील. निवडलेल्या उमेदवारांना अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या तारखेपासून किंवा प्री-कमिशन ट्रेनिंग अकादमी (PCTA) येथे रिपोर्टिंगच्या तारखेपासून लेफ्टनंटच्या रँकमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल.

Indian Army SSC Tech Recruitment 2024 : अधिसुचना

६३ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC)द्वारे टेक पुरुष – https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/SSC_TECH_-63_COURSE_OCT_2024.pdf

३४ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC)द्वारे टेक महिला –https://joinindianarmy.nic.in/writereaddata/Portal/NotificationPDF/DETAILED_NOTIFICATION_FOR_SSC_T_-63.pdf

हेही वाचा – Oil India Limited Recruitment 2024 : ऑइल इंडियामध्ये १०२ जागांवर भरती सुरू; अर्ज कुठे अन् कधीपर्यंत करावा, पाहा….

Indian Army SSC Tech Recruitment 2024 : अर्ज कसा करावा?

  • स्टेप १ : joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • स्टेप २ : मुख्यपृष्ठावर, नोंदणी दुव्यावर क्लिक करा
  • स्टेप ३ : आता, अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • स्टेप ४ भविष्यातील संदर्भासाठी अर्ज सबमिट करा आणि डाउनलोड करा
  • स्टेप ५ भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट घ्या
  • थेट लिंक: इंडियन आर्मी एसएससी टेक २०२४
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army ssc tech recruitment 2024 registration underway for 381 posts at joinindianarmy nic in apply here snk