Indian Bank Bharti 2024: बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडियन बँकेत विविध पदांसाठी ३०० जागांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात देखील झाली आहे. १३ तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुम्ही इंडियन बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेवटची तारीख किती?

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २ सप्टेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया एकून ३०० पदांसाठी सुरू आहे. हे करण्यासाठी तुम्हाला इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट, indianbank.in वर जावे लागेल. येथून तुम्ही अर्ज देखील करू शकता, रिक्त पदांबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकता आणि पुढील अद्यतनांबद्दल देखील जाणून घेऊ शकता.

कोण अर्ज करू शकतो?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. यासोबतच उमेदवाराचे वय २० ते ३० वयोगटातील उमेदवार हे आरामात भरतीसाठी अर्ज करू शकतात.

निवड कशी होईल?

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखत होईल आणि मगच उमेदवाराची निवड ही केली जाईल.

फी किती असेल?

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १००० रुपये फीस ही द्यावी लागेल. आरक्षित श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना १७५ रुपये फीस लागेल. पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

अधिसूचना (Notification)

कसा कराल अर्ज?

१.अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा, म्हणजेच indianbank.in.

२.येथे तुम्हाला लॉगिन विभागात नोंदणी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

३.यानंतर अर्ज भरा.

४.आता तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि विचारले जाणारे शुल्क देखील भरा.

हेही वाचा >> CISF Recruitment 2024: ११३० कॉन्स्टेबल फायरमनच्या पदासाठी होणार भरती! या तारखेपूर्वी करा अर्ज

५.हे केल्यानंतर सबमिट बटण दाबा. आता तुमचा अर्ज पूर्ण झाला आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian bank recruitment 2024 bank job news indian bank recruitment for 300 posts srk